वैश्‍विक लाट समजून घ्या

सकाळ वृत्तसेवा
Friday, 21 June 2019

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली!

शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'ऑल इज वेल' पुरवणीत...

चेतना तरंग
प्रत्येक गोष्ट एका विशिष्ट प्रकारच्या कंपनातून तयार होते. त्याचप्रमाणे, प्रत्येक प्राणीही या अफाट विश्‍वाशी जोडला गेलाय. पृथ्वीवर विशिष्ट प्रकारची वैश्‍विक किरणे आणण्यासाठी तो अशा पद्धतीने विश्‍वाशी जोडला गेलाय. हिंदू धर्मसंस्कृतीत चार देवतांचे वर्णन चार वाहनांच्या माध्यमातून केले आहे. हत्ती गणेशाशी संबंधित विशिष्ट प्रकारची कंपने आकर्षित करतो, तर वाघ देवीच्या विशिष्ट गुणांची, तर मोर भगवान सुब्रमण्यशी संबंधित कंपने आकर्षित करतो. आज संशोधक असे म्हणतात की, जगातून प्राण्याची एकजरी प्रजाती नामशेष झाली तरी आपली पृथ्वी वाचणार नाही. आपले पूर्वजही असेच म्हणायचे. त्यामुळे, या पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाचा आपण आदर करायला हवा, कारण प्रत्येक अणूमध्ये ईश्‍वराचे अस्तित्व दडले आहे.

संपूर्ण निर्मितीमध्ये जाणीव, ज्ञान भरून राहिलेले आहे. तुम्ही एका विशिष्ट कंपन, लाटेशिवाय काहीच नाही. तुमचे शरीर सदासर्वकाळ कंपने किंवा ऊर्जेचे उत्सर्जन करत असते. तुम्ही विश्‍वाकडूनच ही ऊर्जा प्राप्त करता आणि त्याच्यापासूनच गमावता. हा प्रवाह सातत्याने सुरू असून तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशी बदलत असते. तुम्ही नेहमीच ऊर्जेची देवाणघेवाण करत असता.

तुमची जाणीव हेही लाटेचेच कार्य असते आणि त्यात अनेक शक्‍यता, मार्ग असतात. ते सूर्यासारखेच आहे. तुमच्या घराच्या खिडकीतून प्रकाशणारा सूर्य दिसतो, तेव्हा तुम्ही मी सूर्याला ताब्यात घेतलेय, असे म्हणू शकत नाही.

तोच सूर्य शेजारच्या घराच्या खिडकीत तसेच जगात सर्वत्र असतो. त्यामुळे, सूर्य इथेही पूर्णपणे असतो आणि तिथेही तो पूर्णपणे प्रकाशतो. तुम्ही केवळ कंपनं असता. तुमचे शरीर एकावेळी अनेक ठिकाणी असू शकत नाही. मात्र जाणिवेच्या पातळीवर तुम्ही अनेक ठिकाणी असू शकता. तुम्ही फुलाला स्पर्श केला तर तुमची कंपने त्या फुलात प्रवेश करतात. त्यामुळेच संपूर्ण विश्‍व हे जाणिवेचे क्षेत्र आहे. तुम्ही अनेक वेळा कोणाला तरी भेटता आणि आपण त्या व्यक्तीपासून दूर राहायला हवे, असेही तुम्हाला वाटते. दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला वारंवार भेटण्याची इच्छा निर्माण होते. एखादी व्यक्ती आपल्याला नापसंत का करते, याचे तुम्हाला आश्‍चर्य वाटते. आपण हे समजून घेण्यास असमर्थ आहोत. आपल्या कंपनांमुळे हे घडते. आपण आपल्या अस्तित्वामधूनच लोकांकडे बहुतेक प्रमाणात व्यक्त होतो. त्यानंतर बोलण्याचा टप्पा येतो. आपल्या अस्तित्वातील कंपने सर्वप्रथम इतरांना प्रभावित करत असल्याने आपण आपली कंपने बदलायलाच हवीत.

प्राणायाम आणि ध्यानाच्या माध्यमातून त्यांना अधिक सकारात्मक बनविले पाहिजे. वेदांत आणि बुद्धवाद हीच एकच गोष्ट वेगळ्या प्रकारे मांडतो. प्रत्येक गोष्ट ही कंपनेच असून ती बदलत राहतात. ती आपले आयुष्यही बदलू शकतात. ते आपल्याला हवे तेही देऊ शकतात. दररोज दहा मिनिटे ध्यान करा आणि रिते व्हा. एखाद्याच्या राग, आनंदी किंवा निराश होण्यातून लाटेची बदलणारी वारंवारिता समजून घ्या. स्वतःचे स्मितहास्य हरवू न देता या वैविध्याचा आनंद लुटा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article Sri Sri Ravishankar all is well sakal pune today