पंचकोश समजून घेताना..

सकाळ वृत्तसेवा
Friday, 26 July 2019

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली!

शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'ऑल इज वेल' पुरवणीत...

चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग
आपल्यापैकी प्रत्येकाचे अस्तित्व पाच कोशांनी तयार झाले आहे. अन्नारसमय कोश हा पहिला कोश पर्यावरणाचे प्रतिनिधित्व करतो. आपले वातावरण विषारी वायूने भरलेले असते, तर आपल्या शरीराचे अस्तित्व राहिले असते का? नाही ना? पृथ्वीच्या वातावरणात हवा असल्याने आपले शरीर अस्तित्वात आहे. अन्न याचा अर्थ खाद्य आणि रस या शब्दाचा अर्थ रसाळ असा होतो. बाह्य पर्यावरण हे आकर्षक आहे. ते तुमच्या डोळ्यांना आकर्षित करते. सुगंधातून नाकाचा ताबा घेते. त्याचप्रमाणे, आवाजाच्या माध्यमातून मंत्रमुग्ध करते. हा सर्व रसाचा परिणाम आहे.

आपले पर्यावरण अन्न आणि रसाने भरलेले आहे. त्याचप्रमाणे शरीरासाठीही विशिष्ट खाद्य आहे. उदाहरणार्थ, दृष्टी हे डोळ्यांचे खाद्य आहे. शांतता आणि आनंद हे आत्म्याचे अन्न आहे. आपले भौतिक शरीर किंवा प्राणमय कोश हा पंचकोशातील दुसरा कोश होय. प्राणमय कोश ऊर्जेचा जीवनस्रोतच आहे. आपल्या शरीराला प्राणामुळेच किंमत आहे. या प्राणमय कोशामुळेच आपण श्‍वास घेतो. मनोमय कोश हा तिसरा कोश होय. या कोशामध्ये मन, विचार आणि भावनांचा समावेश होतो. विज्ञानमय कोश हा चौथा कोश मनापेक्षाही सूक्ष्म आहे. हा कोश म्हणजे एक प्रकारची अंतर्ज्ञानी भावना होय.

ती विचार किंवा कोणत्याही कारणाच्या पलीकडे असते. तुमच्यामधील या कोशातून सृजनशीलता किंवा नवकल्पना उगम पावतात. प्रत्येक शोध, नावीन्यपूर्णता, नवीन कला, कविता विज्ञानमय कोशातूनच उगम पावते, मनोमय कोशातून नव्हे. आनंदमय हा पाचवा कोश आहे. ते एक प्रकारचे आनंददायक शरीर होय. भौतिक शरीरापेक्षा ते खूप मोठे असते. त्यामुळेच तुम्ही आनंदी असता तेव्हा स्वतःमध्ये विस्ताराची भावना अनुभवता. त्याचप्रमाणे तुम्ही दु:खी असता तेव्हा दबल्यासारखे वाटते. कोणत्याही व्यक्ती हे पाच प्रकारचे कोश अनुभवू शकतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article Sri Sri Ravishankar all is well sakal pune today