अर्थ अपूर्णत्वाचा...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 November 2019

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली!
शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'ऑल इज वेल' पुरवणीत...

चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग
प्रत्येक वस्तूच्या पलीकडे अनंत आहे. वस्तू या मर्यादित आणि नेहमी बदलणाऱ्या असतात; तथापि त्या कधीही न बदलणाऱ्या अनंत अवकाशात असतात. कोणतीही वस्तू परमाणूंच्या स्वरूपात बदलल्यास तुम्हाला आढळेल की प्रत्येक परमाणूत अनंत अवकाश आहे. अनंत हे वस्तूंच्या पलीकडचे आहे. प्रत्येक व्यक्तीहून विशाल प्रेम आहे. व्यक्तिमत्त्व बदलत असते. शरीर, मन व वर्तनाच्या पलीकडे एक दृढ प्रेम असते. तुम्ही मूर्तिमंत प्रेम आहात. तुम्ही स्वतःमध्ये हरवाल, तेव्हा ‘स्व’त्व सापडेल.

घटनेपलीकडील घटना म्हणजे ज्ञान. वस्तूपलीकडील वस्तू म्हणजे अनंत. व्यक्तीपलीकडील व्यक्ती म्हणजे प्रेम. माया- भ्रांती. म्हणजेच तुम्ही प्रसंगात, व्यक्तिमत्त्वात किंवा वस्तूत अडकून पडणे. ब्रह्मन - ईश्‍वरी विवेक म्हणजे या सर्वांच्या पलीकडचे दिसणे. पाहिलेत का? 

तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे पाच पैलू आहेत. - अस्ति (असणे), भाति (ज्ञान, अभिव्यक्ती), प्रीती (प्रेम), नाम, रूप. 
अचेतन वस्तूचे दोन पैलू आहेत नाम व रूप. चेतनेचे तीन पैलू आहेत. अस्ति (ते ‘आहे’), भाति (त्याला ज्ञान आहे आणि ते व्यक्त होते.), प्रीती (प्रेममय आहे.), अखंड ब्रह्मांडाचे हेच रहस्य आहे. चेतनेचे हे तीन पैलू जाणणे आणि तरीही अचेतनाच्या नामरूपात गुंतून पडणे हीच माया (अज्ञान भ्रम) आहे.

प्रश्‍न - आपण अपूर्ण का असतो?
गुरुदेव -
 आपण पूर्णतेकडे वाटचाल करावी, म्हणून. अपूर्णतेकडून परिपूर्णतेच्या दिशेने प्रवास म्हणजेच आयुष्य आहे. एका बीजामध्ये पूर्ण वृक्ष सामावलेला असतो, पण वृक्ष होण्यासाठी त्याला आपले बीज-स्वरूप सोडावेच लागते. जीवनात एकतर तुम्ही प्रत्येक पावलावर अपूर्णता पाहू शकाल किंवा एका पूर्णतेकडून दुसऱ्या पूर्णतेकडे असणारी ओढ (गतिशीलता) पाहाल. तुम्ही आपले ध्यान केंद्रित कराल त्याचा विकास होईल. तुमचे ध्यान कोणत्या त्रुटींवर असेल, तर त्या त्रुटींचीच वाढ होईल.

माया - तुम्ही नेहमी आनंदी कसे असू शकता? ‘नेहमी’बद्दल विसरा, मग तुम्ही केवळ आनंदी व्हाल. नेहमी आरामात राहण्याच्या इच्छेतून माणूस आळशी बनतो. नेहमीच श्रीमंत असण्याच्या इच्छेतून माणूस हावरट बनतो. फक्त सजीवताच कायमस्वरूपी आहे, हे आपल्याला हे जाणवत नाही, की तेव्हा भय निर्माण होते. स्वतःबद्दलची ठळकपणे दिसणारी गोष्ट म्हणजे ‘नेहमी’ कालाबाधिताकडे जाणारे असते. जे कधीच ‘सर्वकाळ’ असू शकत नाही, त्याला माया म्हणतात. काही आश्‍चर्यजनक, सुंदर आणि आनंददायी असते, तेव्हा आपल्याला वाटते, हे स्वप्न तर नाही ना? जे तुम्ही वास्तवात पाहता. ते बऱ्याचदा आनंददायी नसते. विपत्ती येते तेव्हा तुम्हाला ‘हे स्वप्न आहे’ असे वाटत नाही.

हे खरेच आहे याची तुम्हाला खात्री असते. हेच तर सत्याला खोटे आणि असत्याला खरे समजणे आहे. वास्तविक सारी दुःखे ही खोटी असतात. सुज्ञ जाणतो की सुख, जे तुमचा स्थायी स्वभावधर्म आहे, तेच खरे सत्य असते. दुःख हे खरे नाही, कारण ती फक्त क्लेशाची आठवण असते. तुम्ही या दोन्हीही गोष्टी स्वप्नवत असल्याचे जाणाल, तेव्हाच तुम्ही खरेखुरे ‘स्व’त्वात राहाल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article Sri Sri Ravishankar all is well sakal pune today