#MokaleVha : घटस्फोट घेतल्यानंतर एकटेपणाची भीती वाटत आहे. 

सुचेता कदम
Sunday, 4 October 2020

एकटेपणा आणि एकाकीपणा यामधील स्पष्टता लक्षात न आल्यास नैराश्‍य, अस्वस्थता, भीती निर्माण होते. घटस्फोटाकडे ज्या दृष्टिकोनातून पाहाल, तसे विचार मनात येतात. घटस्फोटामुळे विसंवाद, नात्यातील तणाव, भांडणे, वाद संपुष्टात आलेली आहेत. एक नातेसंबंध तुटले म्हणजे आयुष्य संपलेले नाही.

घटस्फोट घेतल्यानंतर एकटेपणाची भीती वाटत आहे. 
एकटेपणा आणि एकाकीपणा यामधील स्पष्टता लक्षात न आल्यास नैराश्‍य, अस्वस्थता, भीती निर्माण होते. घटस्फोटाकडे ज्या दृष्टिकोनातून पाहाल, तसे विचार मनात येतात. घटस्फोटामुळे विसंवाद, नात्यातील तणाव, भांडणे, वाद संपुष्टात आलेली आहेत. एक नातेसंबंध तुटले म्हणजे आयुष्य संपलेले नाही.

भूतकाळातील चुका, घटना यांच्यामध्ये न अडकता वर्तमान परिस्थितीत क्रियाशील राहणे गरजेचे आहे. नातेवाईक, सहकारी, मित्रपरिवार यांच्याशी आपुलकीने वागा म्हणजे भीती वाटणार नाही. पुनर्विवाहाचा पर्यायही तुमच्यासमोर आहे. चुकांची पूर्नरावृत्ती होऊ नये, यासाठी जाणीवपूर्वक स्वतःमधील कोणते दोष नात्याला बाधक ठरतात किंवा जुळवून घेण्यास शक्य नसणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत, याची जाणीव विवाहपूर्वीच जोडीदार निवडताना असल्यास नात्यात अडचणी येण्याची शक्यता कमी असते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जोडीदाराच्या निधनानंतर ज्येष्ठांनी वेळ कसा घालवावा. 
रिकामे मन सैतानाचे घर, अशी म्हण आहे. कोरोनामुळे ज्येष्ठ नागरिकांचे गट, मिटींग, उद्यानातील भेटीगाठी बंद आहेत. त्यामुळे मनावर निश्‍चितच ताण येऊ शकतो. उद्याचा दिवस जास्त आनंदाने कसा घालवता येईल याचे, आदल्या दिवशी रात्री नियोजन करा. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवसाची सुरुवात करायची. त्यामुळे मनावरील ताण हलका होईल. ठरवलेल्या गोष्टी पूर्ण केल्याने आत्मविश्‍वास वाढतो. मनात आनंद निर्माण करतील असेच टीव्हीवरील कार्यक्रम पाहा. संतसाहित्य वाचून ते आचरणात आणण्याचा प्रयत्न केल्यास वयोमर्यादा कमी वाटू लागेल, इतके ज्ञान आत्मसात करता येऊ शकते. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article sucheta kadam on mokale vha