कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शेती हे समीकरण सगळ्यांनाच धक्का देणारे ठरले आहे. सत्या नाडेला आणि एलॉन मस्क यांनीही बारामती येथील प्रयोगाचे स्वागत केले. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सर्वच क्षेत्रांत करणे गरजेचे आहे. जागतिक स्पर्धेत चीनशी आपल्याला बरोबरी करायची असल्यास कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आवश्यकच आहे.
पुण्यातील भारत फोर्ज या कंपनीने याबद्दलच यशस्वी प्रयोग केलाय. पुढील पिढ्यांच्या भवितव्यासाठी आपल्याला हे करावेच लागेल. याबाबत राजकीय, नोकरशाही यांची इच्छाशक्ती फार कमी आहे, हीच खरी समस्या आहे.