मानवतेला उन्नत करण्यासाठी ‘एआय’ची क्षमता अतुलनीय आहे, परंतु त्याचे धोकेदेखील तितकेच आहेत. प्रश्न असा आहे, की एआय विनाशाच्या शक्तीऐवजी प्रगतीचे साधन म्हणून काम करेल याची खात्री करण्यासाठी जगातील राष्ट्रे वेळेत एकत्र येतील का? जगाला एकत्र आणण्याचे नेतृत्व भारत दाखवू शकेल का? अशा नाजूक समयी जगात एकमत निर्माण करणारे राष्ट्र म्हणून उदयास येण्याची भारतासाठी ही एक अनोखी संधी आहे.