...तेव्हा खचले काश्‍मिरी हिंदूचे मनोबल...

दरवर्षी ‘१४ सप्टेंबर’ हा दिवस काश्‍मिरी हिंदू आणि संघटनांद्वारे ‘बलिदान दिन’ म्हणून पाळला जातो. जे या कार्याला पाठिंबा देतात. हे तेच लोक आहेत, ज्यांना १९९० च्या दशकामध्ये दहशतवादामुळे काश्मीरमधून अन्यत्र जावे लागले होते.
...तेव्हा खचले काश्‍मिरी हिंदूचे मनोबल...

दरवर्षी ‘१४ सप्टेंबर’ हा दिवस काश्‍मिरी हिंदू आणि संघटनांद्वारे ‘बलिदान दिन’ म्हणून पाळला जातो. जे या कार्याला पाठिंबा देतात. हे तेच लोक आहेत, ज्यांना १९९० च्या दशकामध्ये दहशतवादामुळे काश्मीरमधून अन्यत्र जावे लागले होते. वास्तविक काश्‍मीरमधील ''बलिदान दिवस'' साजरा करण्याच्या दृष्टीने ब्रिटनच्या संसदेत २०२० मध्ये १४ सप्टेंबरलाच एक ठराव सादर करण्यात आला होता. या ठरावामध्ये पुढीलप्रमाणे उल्लेख करण्यात आला होता:- "हे भवन १४ सप्टेंबर या रोजी अत्यंत दुःखानं काश्मिरी हिंदूंच्या बलिदान दिवसाचं स्मरण करतं - त्या हिंदूंच्या स्मरणार्थ जे इस्लामी जिहाद (धर्मयुद्ध) अंतर्गत सीमेपलीकडून होणाऱ्या अनन्वित अत्याचारांना बळी पडले होते. त्या नृशंस मानवी हत्याकांडाच्या घृणास्पद कृतीमध्ये ज्या सर्व व्यक्ती मारल्या गेल्या होत्या, ज्यांवर बलात्कार करण्यात आले होते आणि ज्या व्यक्ती या हिंसाचारात जखमी झाल्या होत्या. त्यांचे मित्र (सहृद) आणि कुटुंबीयांप्रति हे भवन (ही संसद) खेद व्यक्त करते. ही संसद या सर्व काश्मिरी व्यक्तींच्या बाबतीत संवेदनशील आहे ज्या व्यक्तींनी त्यांचा जीव वाचविण्यासाठी जे अत्याचार झाले, त्यांना आजही न्याय मिळालेला नाही.‌ त्यावेळी या मानवी समुदायाचं निर्मम (निघृण) रितीनं उच्चाटन करण्यात आलं. त्यांपैकी जीवित राहिल्या त्या काश्मिरी पीडितांच्या समुदायानं मनाचा जो कणखरपणा आणि धैर्य यांचं जे प्रदर्शन केलं त्यांची ही संसद मनःपूर्वकरित्या प्रशंसा करते; पनुन काश्‍मिरींनी त्यावेळी काश्मिरी हिंदूंच्या अधिकारांसाठी जो लढा उभा केला, ही संसद त्याची जाण ठेवते आणि भारत सरकारला अशी विनंती करते की भारताने त्यांच्या आंतरराष्ट्रीय कर्तव्याला बांधील राहून मानव हत्या (सामूहिक हत्या) अपराधासाठी दंडात्मक कायदा बनवावा कारण की भारत हा देश सामूहिक मानव हत्या या अपराधाला दंडित आणि प्रतिबंधित करण्यासाठीच्या राष्ट्रसंघाच्या कराराचा एक उद्गाता (उद्घाटक) आणि स्वाक्षरी करणारा देश आहे.’’

काश्‍मीर खोऱ्यामध्ये काश्मिरी हिंदूंचे नेते पंडित टिकालाल टपलू यांची हत्या १९८९ मध्ये १४ सप्टेंबरला करण्यात आली जी एका महत्त्वपूर्ण व्यक्तीची हत्या होती, ज्यामुळे पुढील वर्षापासून १९ जानेवारीपासून काश्मीरमधून काश्मिरी हिंदूंचे मोठ्या संख्येने स्थलांतर होण्यास सुरुवात झाली.

या भागातील हा जो संघर्ष उफाळून आला त्याला कारणीभूत ठरणारी पंडित टपलूंची हत्या हे एक मोठे कारण होते कारण की काश्मिरी खोऱ्यातील काश्मिरी हिंदूंचे ते (पंडित टपलू) सर्वात महत्त्वाचे नेते होते. त्यांच्या हत्येपासून काश्मिरी हिंदूंच्या नेत्यांवरील अतिरेक्यांच्या हल्ल्यांना सुरुवात झाली.

पंडित टपलूंची हत्या हा काश्मिरी हिंदूंच्या मनोबलावर झालेला सर्वात मोठा आघात होता ज्या हिंदूंनी काश्मीर खोऱ्यात वास्तव्य करण्याची खूणगाठ बांधली होती. असं वाटतं की त्यांना (पंडित टपलूंना) अगदी ठरवून निशाणा बनविण्यात आलं जेणेकरून एका विशिष्ट जमातीच्या हत्येचं सत्र सुरू झालं ज्यामुळे हजारो काश्‍मिरी हिंदूंनी तेथून निघून जाण्यास सुरुवात केली.

पंडित टपलूंनी कला क्षेत्रामध्ये पदव्युत्तर पदवी आणि कायद्याची पदवी अलिगड मुस्लिम विद्यापीठातून घेतली आणि ते काश्मीर बार येथे १९५७ मध्ये रुजू झाले. सुरुवातीला अन्य काही काश्मिरी हिंदू समवेत त्यांनाही प्रवेश नाकारण्यात आला होता. त्याचा प्रतिकार म्हणून त्यांनी विद्यापीठाच्या परिसरातच आंदोलन सुरू केलं आणि धरणं धरलं. मात्र त्यांच्या या आंदोलनामुळे अलिगड मुस्लिम विद्यापीठाला माघार घ्यावी लागली आणि झालं असं की सर्वांनाच तिथं प्रवेश द्यावा लागला.

पंडित टपलू यांचा संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशीही आला. उच्च न्यायालयाचे वकील म्हणून १९७१ मध्ये त्यांना काम करण्याची संधी देण्यात आली. टपलू यांचा विवाह १९५७ मध्ये सरला यांच्याशी झाला, त्या एका सरकारी शाळेत शिक्षिका होत्या. जेव्हा तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधींनी १९७५ मध्ये देशात आणिबाणी लादली त्यावेळी श्रीनगर येथील लाल चौकात त्यांनी स्वतःला अटक करवून घेतली आणि काश्मीर खोऱ्यात आणीबाणीच्या विरोधातील या लढ्याचं नेतृत्व त्यांनी केलं.

त्यांच्या अनुयायांमध्ये प्रचंड प्रमाणात हिंदू होते तसेच मुस्लिमही होते. विविध धर्मातील लोकांना ते जी मदत करत असत त्यामुळे त्यांना सर्वच लोक प्रेमाने ''लाला'' म्हणून संबोधत असत (''लाला'' या नावानं ते जनसामान्यांमध्ये प्रसिद्ध होते, ज्याचा अर्थ पुश्तू भाषेत ''मोठा भाऊ'' असा होतो). त्यांनी व्यापक प्रमाणात केलेले सामाजिक कार्य आणि त्यांची संयमी जीवनशैली यामुळे ते जनसामान्यांमध्ये सर्वपरिचित होते. मुस्लिमांमधील त्यांची लोकप्रियता ही काश्मीरमधील दहशतवाद्यांसाठी एक महत्त्वाचं आव्हान ठरू लागलं होतं. त्यामुळे ते १९८० च्या शतकादरम्यान तेथील वातावरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करू लागले होते.

जेव्हा पंडित टपलूंना अतिरेक्यांकडून अनेक धमक्या मिळू लागल्या त्यावेळी त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना दिल्लीला हलविलं, मात्र अतिरेक्यांना आव्हान देण्यासाठी ते परतले. त्यांना दिल्लीहून परत येऊन केवळ चार दिवसच उलटले होते त्यावेळी त्यांच्या चिंकराल मोहल्ला येथील निवासस्थानी त्यांच्यावर हल्ला झाला.‌ त्यांच्यावर आक्रमण करणार्‍या अतिरेक्यांना त्यांच्यावर हल्ला करण्याचं त्यांनी सार्वजनिक आव्हान दिलं. त्यांच्यावर १४ सप्टेंबर रोजी दिवसाढवळ्या हल्ला करून त्यांची हत्या केली. त्यांच्या अंत्ययात्रेत हजारोंच्या संख्येने लोक सामील झाले ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि केदारनाथ साहानी हेही उपस्थित होते. टपलू हे भाजपच्या जम्मू - काश्मीर विभागाचे उपाध्यक्षही होते. काश्मीर खोऱ्यातील मुस्लिमही या अंत्ययात्रेत मोठ्या संख्येत सहभागी झाले होते. काश्मीर खोऱ्यात कणखरपणे वास्तव्य करणाऱ्या काश्मिरी हिंदूंच्या या निर्धारावर झालेला हा मोठा प्राणघातक घाला होता आणि त्यामुळे या समुदायांमध्ये संतापाच्या लाटा उसळल्या. त्यांनी एका दिवसासाठी सर्व दुकाने आणि व्यापारी आस्थापना बंद ठेवून त्यांच्या निषेधाला वाट मोकळी करून दिली आणि पंडित टपलूंच्या हत्तेचा निषेध व्यक्त केला. ही कदाचित पहिलीच वेळ होती जेव्हा काश्‍मिरी हिंदूंनी काश्मीर खोऱ्यात ''बंद'' पाळला होता आणि ज्यानंतर तिथं लवकरच हत्यांचं सत्र सुरू झालं.

टपलूंच्या मृत्यूनंतर श्रीनगरच्या जिल्हा सत्र न्यायाधीश निळकंठ गंजू यांना गोळी झाडून ठार मारण्यात आलं. दहशतवादी मकबुल भट जो ''नॅशनल लिबरेशन फ्रंट'' या विघटनवादी संघटनेचा प्रमुख होता, त्याला न्यायाधीश गंजू यांनी मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली होती. मकबूल भट याला नवी दिल्लीतील तिहार तुरुंगामध्ये ११ फेब्रुवारी, १९८४ रोजी फासावर लटकवण्यात आलं होतं. १९८९ मध्ये जम्मू-काश्मीर राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी जुलै ते डिसेंबर १९८९ या कालावधीत जवळजवळ सत्तर दहशतवाद्यांना मुक्त करण्याचे आदेश दिले होते आणि या दहशतवाद्यांना पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील दहशतवादी तळांमध्ये प्रशिक्षण देण्यात आलं होतं.

या दहशतवाद्यांपैकी सर्वात महत्वाचे चार दहशतवादी होते हमीद शेख, अश्फाक वाणी, जावेद मीर आणि यासीन मलिक. या भागात तातडीची (आणीबाणीची) परिस्थिती निर्माण करण्यामध्ये आणि खोऱ्यात हिंदूविरोधी वातावरण निर्माण करण्यात त्यांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली. १९८९ हे वर्ष संपता - संपता काश्मीर खोऱ्यात इस्लामचं राज्य अधिसत्ता स्थापित करण्याची आणि त्याला भारतापासून तोडण्याची मागणी चरमसीमेपर्यंत पोहोचली होती.१९ जानेवारी, १९९० च्या संध्याकाळी पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या घोषणाबाजीची सुरुवात तेथील खोऱ्यातील मशिदींमधून होण्यास सुरुवात झाली आणि तिथं जमाव गोळा होऊ लागला. तेथील हिंदूंनी एक तर धर्मपरिवर्तन करून इस्लाममध्ये जावं आणि विभाजनवाद्यांना सामील व्हावं किंवा त्यांनी त्यांची घरं सोडून तिथून पलायन करावं असा मजकूर लिहिलेले पोस्टर्स तिथं झळकू लागले.

अशा स्फोटक परिस्थितीत त्याच रात्री हजारो हिंदूंनी तिथून बाहेर पडणं पसंत केलं. जम्मू-काश्मीर अभ्यास केंद्राच्या एका अहवालानुसार दिल्लीस्थित एका थिंक टँकच्या म्हणण्यानुसार मार्च १९९० पर्यंत खोऱ्यात राहणाऱ्या ९० टक्‍क्‍यांहून अधिक हिंदूनी त्यांची घरे सोडली होती. दरम्यानच्या काळात बहुतांश हिंदूंची घरे जाळून टाकण्यात आली होती आणि त्यांची काश्मीर खोऱ्यातील जी काही थोडीफार चल संपत्ती होती ती लुटून नेण्यात आली होती. ते भले काहीही असो - या सर्व घटनांची सुरुवात १४ सप्टेंबर, १९८९ रोजी झालेल्या पंडित टपलू यांच्या हत्येनं झाली होती, हे निश्चित !

(सदराचे लेखक दिल्लीतील ‘विचार विनिमय केंद्रा’चे संचालक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com