
Asha Dining Hall Serving Home-like Satvik Meals for 75 Years
Sakal
प्रशांत ननावरे - nanawareprashant@gmail.com
विद्यार्थ्यांसाठी खाणावळ म्हणून ७५ वर्षांपूर्वी सुरू झालेले ‘आशा डायनिंग हॉल’ आता पुणेकरांसह बाहेरून येणाऱ्या मंडळींसाठी घरगुती, चविष्ट, सात्त्विक आणि ताज्या जेवणासाठीचे हक्काचे ठिकाण झाले आहे. घरी जेवल्यावर ज्याप्रमाणे समाधान मिळतं तीच भावना इथून बाहेर पडताना असते. पंचाहत्तर वर्षांच्या मेहनतीचं हे संचित आहे.