

Asia Cup Trophy Controversy
esakal
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आशिया करंडक जिंकला; पण आशिया क्रिकेट परिषदेचे हेकेखोर अध्यक्ष पाकिस्तानचे मोहसिन नक्वी यांनी पळवलेली ट्रॉफी विजेते असूनही भारताला मिळालेली नाही. आता १९ वर्षांखालील आशिया करंडक स्पर्धेत भारतीय संघ खेळतोय. तिथेही तीच पुनरावृत्ती घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तीन महिन्यांपूर्वी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली तीन सामन्यांत पाकिस्तान संघाला धूळ चारली आणि थाटात आशिया करंडक जिंकला. आशिया क्रिकेट परिषदेचे हेकेखोर अध्यक्ष पाकिस्तानचे मोहसिन नक्वी यांनी पळवलेली ट्रॉफी विजेते असूनही भारताला मिळालेली नाही. आता १९ वर्षांखालील आशिया करंडक क्रिकेट स्पर्धा शुक्रवारी सुरू झालीय. आज भारत-पाक सामना होतोय. तरीही सीनियर संघाने जिंकलेला करंडक भारताच्या स्वाधीन झालेला नाही. मुंबईकर आयुष म्हात्रेच्या नेतृत्वपदी आणि वैभव सूर्यवंशीसारख्या धडाकेबाद फलंदाजाचा समावेश असलेल्या भारतीय संघाने हा १९ वर्षांखालील आशिया कप जिंकला, असे आपण गृहीत धरले आणि अध्यक्ष या नात्याने मंचावर उपस्थित असलेल्या मोहसिन नक्वी यांच्या हातून ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय संघाने नकार दिला तर त्याच घटनेची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहे.