
ओंकार वर्तले - ovartale@gmail.com
उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावरील असीरगड किल्ला. हा सारा भाग तापी आणि नर्मदा या दोन नद्यांच्या खोऱ्यांमधील. त्यामुळे आपोआपच या किल्ल्याचे भौगोलिक महत्त्व आहे. दख्खनच्या मार्गावरचा राखणदार होता, असेही असीरगड किल्ल्याला संबोधले जाते. अनेक इतिहास अभ्यासक याला दक्षिणेचे प्रवेशद्वार असेही म्हणतात.