

Automatic Emergency Braking system benefits
Sakal
अपघाताची शक्यता कमी करणारी प्रणाली वाहनाचा ‘बॉडीगार्ड’ म्हणून नावारूपास येत आहे. दरवर्षी असंख्य अपघात टाळणारे हे तंत्रज्ञान आज प्रत्येक नवीन मोटारीत अनिवार्य होत आहे. पण ही प्रणाली नेमकी कशी काम करते आणि एईबी म्हणजे रस्त्यावरील सायलेंट गार्डियन असे का म्हणतात, ते पाहणे महत्त्वाचे आहे.
तुम्ही वेगात मोटार चालवत आहात. अचानक समोरचा ट्रक थांबतो. अशावेळी चालकाची भंबेरी उडते, पण घाबरू नका. तुम्ही जरी गोंधळलेला असाल तरी समोरचा अडथळा पाहून तुमची मोटार स्वतः थांबते. यामागे सायन्स फिक्शन नाही किंवा प्रासंगिक निर्णय. वास्तविक ही ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग प्रणालीची जादू आहे.