
मुंबई - गेल्या ७५ वर्षांत देशातील ५० महनीय व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला असून यात चित्रपट आणि संगीत क्षेत्रातील सात जणांचा समावेश आहे. मात्र भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक असलेल्या दादासाहेब फाळके यांचा यात समावेश नसल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केली. फाळके यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.