

Ayurveda Social Work
sakal
आशिष तागडे-ashish.tagade@esakal.com
वैद्य म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर नाडीपरीक्षण करणारी आयुर्वेदातील तज्ज्ञ व्यक्ती येते. आयुर्वेदात नाडीपरीक्षण महत्त्वाचे असते. मात्र, व्यक्तीबरोबर समाजाचीही नाडी अचूक ओळखणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे दिवंगत वैद्य परशुराम य. खडीवाले तथा दादा. आपण समाजाचे काही तरी देणे लागतो आणि समाजासाठी काही तरी करू शकतो ही भावना ठेवून अखंड कार्यरत राहिलेले एक व्रतस्थ व्यक्तिमत्त्व!