
ऋचा थत्ते - rucha19feb@gmail.com
आयुष्यात आलेल्या सगळ्या आव्हानांना न घाबरता बहिणाबाई नेहमीच ताठ मानेने, स्वाभिमानाने जगल्या. कणखर आणि खंबीरपणे. त्यांच्या शब्दांतून आपल्यालाही कायमच प्रेरणा मिळत राहते. अनुभव, कल्पना, विचार, भावना इतकं सगळं मांडलं तेही अहिराणीचा गोडवा जपत. बहिणाईंच्या कवितेत ‘धरित्रीचा परमय’ आहे, ‘आला पाऊस पाऊस’ हा चिंब अनुभव आहे, ‘हिरिदात सूर्यबापा’देखील उजळला आहेच, देवाची चाहूल पानातून देणारा वाराही आहे आणि त्यांचं अवघं जगणं तर ‘उच्च गगनासारखं’ आहे...