
कुंडलिक पाटील - sakal.kundlik@gmail.com
अगदी आठ-दहा गुंठे शेती असलेल्या अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांनी शेतीपेक्षा दुग्धपालनाचा मार्ग स्वीकारला. उसापेक्षा चारा उत्पादन करण्याला प्राधान्य दिले. बहिरेश्वर गावाने वेगळा मार्ग पत्करून आपला विकास तर केलाच पण करवीर तालुक्यातील अन्य शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केलाय.