

Overview of the Book “Bajirao The Great”
sakal
मयूर भावे - mayur.bhave@esakal.com
संवेदनशील मनाच्या कोणत्याही व्यक्तीला मग तो सामान्य वाचक असो अथवा अभ्यासक, इतिहासाचा मोह झाल्याशिवाय राहत नाही. इतिहासाचं वाचन, अभ्यास आणि त्यातून काही तरी नवं शोधण्याची उर्मी ज्या वेळी शिगेला पोहोचते, त्या वेळी त्या वेडाने झपाटलेले जीव नवनिर्मिती केल्याशिवाय स्वस्थ बसू शकत नाही. इतिहासाच्या अशाच वेडातून साकार झालेली अभ्यासपूर्ण कलाकृती म्हणजे ‘बाजीराव द ग्रेट!’ हा विजय पानवलकर यांनी लिहिलेला ग्रंथ!