

Hasina's Death Sentence and India
esakal
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना पदावर असताना एकाधिकारशाही पद्धतीनं वागत होत्या, हे खरं आहे. त्यांची सत्ता उलथवणाऱ्या आंदोलनाला मोडून काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला, हेही खरं. मात्र त्यासाठी त्यांना फाशीची सजा द्यावी का आणि तोच न्याय मग त्याच रीतीनं आंदोलनं चिरडणाऱ्या विद्यमान बांगलादेशी राज्यकर्त्यांना का लावला जाऊ नये, असे प्रश्न विचारले जाताहेत, ते रास्त आहेत. हसीना यांना फाशीची सजा सुनावण्यापाठोपाठ त्यांना भारतानं परत पाठवावं, असंही बांगलादेशनं सुचवलं आहे. ज्याची शक्यता कमी. तेव्हा उभय देशांत हा आणखी एक ताणाचा मुद्दा बनणार आहे. यातच तिथं इस्लामी मूलतत्त्ववाद्यांचा पगडा वाढणं त्यात भर टाकणारं आहे. बांगलादेशही पाकिस्तानाच्या वाटेनं जाण्याचे संकेत या घडामोडी देत आहेत. ते अधिक चिंतेचे.