
अदिती देशपांडे - saptrang@esakal.com
मला आजवर अनेक भूमिका करायला मिळाल्या; पण काही अनुभव असे आहेत ज्यांनी मला कलाकार म्हणून नाही, तर एक माणूस म्हणून घडवलं आहे. विजय तेंडुलकर यांच्या ‘बेबी’ नाटकातील भूमिका असो वा मी स्वत:च निर्मिती केलेला ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’ हा चित्रपट असो, या कलाकृतींमुळे स्त्री जाणिवा अधिक समृद्ध झाल्या आहेत.