

Influence Of English On Marathi
esakal
इंग्रजी भाषेचा मराठीवर प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रभाव पडला असून, तो आज वापरल्या जाणाऱ्या भाषेत सर्रासदिसतो असं सर्वत्र एकमुखाने बोललं जात असलं, तरी त्या प्रभावाचे भाषेच्या दृष्टिकोनातून विश्लेषण होणं व ते वाचकांपर्यंत पोहोचणं वेळोवेळी आवश्यक असतं. ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी ‘द इन्फ्लुएन्स ऑफ इंग्लिश ऑन मराठी’ या पुस्तकातून हा प्रयत्न केला. हे पुस्तक त्यांच्या पीएच.डी. प्रबंधावर आधारित आहे. त्याचा मराठी अनुवाद ‘इंग्रजीचा मराठीवरील प्रभाव : समाजभाषावैज्ञानिक आणि शैलीलक्ष्यी अभ्यास’ या शीर्षकाखाली नुकताच प्रकाशित झाला आहे. डॉ. विजया देव यांनी हा अनुवाद केला असून, प्रभाकर ना. परांजपे यांचं मार्गदर्शन व प्रस्तावना या प्रकल्पाला लाभली आहे. या प्रस्तावनेत त्यांनी नेमाडेंशी असलेली त्यांची मैत्री व महाविद्यालयाचे दिवस या आठवणींनाही उजाळा दिला असल्याने वाचकांसाठी ती वेगळी र्वणी आहे.