
प्रशांत ननावरे - nanawareprashant@gmail.com
प्रत्येक पदार्थ एका विशिष्ट समुदायाची ओळख असतो, मात्र तो बनवताना त्यात प्रेम आणि आपुलकीची भावना असेल, तर दुसऱ्या समुदायातील व्यक्तीलाही तो तितकाच लज्जतदार बनवणे जमू शकते. ‘भवानी मिसळ’ त्याचे उत्तम उदाहरण आहे. माळी कुटुंब मूळचे राजस्थानातील असले तरी महाराष्ट्रातील सहा दशकांचे वास्तव्य, अस्खलित मराठी आणि इथल्या मातीने दिलेले वैभव याची कृतज्ञता त्यांच्या बोलण्यातून जाणवते.