rationalism
Esakal
वैजयंती बेलसरे
saptarang@esakal.com
विवेकयात्री’ हे डॉ. अभिजित वैद्य यांचे पुस्तक म्हणजे फार जगभर काळाच्या विविध टप्प्यात, विविध प्रदेशांत अंकुरलेल्या, रुजलेल्या आणि विकसित झालेल्या विवेकवादाच्या प्रवासाचे अंतर्मुख करणारे चित्रण आणि चिंतन आहे. पाचशे पानांचे हे पुस्तक खरे तर गंभीर प्रकृतीचे असूनही ते वाचत असताना आपले मन थकत नाही, याची कारणे दोन आहेत. एक - लेखकाची संवाद साधत जाणारी ओघवती सुगम लेखनशैली आणि दुसरे म्हणजे, विवेकवादाचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचवण्याची तळमळ.