स्वागत नव्या पुस्तकांचे

दहावी-बारावीनंतर योग्य करिअर निवडण्यासाठी डॉ. श्रीराम गीत लिखित 'करिअरचा बी प्लान' हे मार्गदर्शक पुस्तक आणि माणिक वर्मा यांच्या प्रतिभावान कुटुंबाच्या कला-प्रवासाचे दर्शन घडवणारे 'माणिक मोती' हे स्मृतिचित्रण पुस्तक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्रोत ठरत आहेत.
Career Choice After 10th/12th: The Need for Clarity

Career Choice After 10th/12th: The Need for Clarity

Sakal

Updated on

करिअरचा बी प्लान

दहावी-बारावीनंतर योग्य करिअरची निवड करणं खूप महत्त्वाचं असतं. प्रत्येकाला आपल्या आवडी-निवडी, क्षमता आणि मूल्य यांचा सारासार विचार करून करिअरचा योग्य तो मार्ग निवडावा लागतो. ही निवड अधिक सोपी व्हावी यासाठी डॉ. श्रीराम गीत लिखित ‘करिअरचा बी प्लान’ हे पुस्तक मुलांनी आणि पालकांनी वाचायला हवं. या पुस्तकात दिलेल्या ‘सक्सेस स्टोरीज’ करिअरनिवडीचा योग्य मार्ग दाखवतील आणि प्रेरणाही देतील. स्वतःचं उत्तम आणि हटके करिअर घडवणाऱ्या यशवंतांच्या या कथा वाचताना विद्यार्थ्यांना करिअरचे नवे पर्यायही समजतील व त्यांना स्वतःची नवी वाटही सापडेल.

वैशिष्ट्य : विविध क्षेत्रातील २५ यशस्वी व्यक्तिमत्त्वांच्या कथा व त्यातून समोर येणारे तात्पर्य.

  • प्रकाशन : मनोविकास प्रकाशन,

  • पृष्ठे : १५२ मूल्य : १९९ रु.

  • मुखपृष्ठ - राजू देशपांडे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com