
- गौरी देशपांडे, gaurisdeshpande1294@gmail.com
डिप डिपने खाली वाकून पाहिलं. बऱ्याच नजरा तिच्यावर रोखलेल्या होत्या. तिने कापीला उचलून सर्वांसमोर धरलं आणि सांगितलं, “पाहिलंत ना, मी कापीला शोधत होते मीमोसाठी!”
होती कुठे ही डिप डिप नक्की? आणि ती तिथे पोहोचली कशी? ते सगळं सांगतेच, पण त्या आधी या ‘डिप डिप’ची ओळख करून देते. ‘डिप डिप’- शाळेतली सगळ्यात खोडकर मुलगी. इकडून तिकडे भटकणं असो, शाळेच्या व्हरांड्यात भिरभिरणं असो किंवा मधल्या सुट्टीत खाऊवरून भांडण करणं असो, डिप डिप नेहमी सगळ्यांत पुढे असायची. दिवसा अखेरीस डिप डिपचं अस्ताव्यस्त आणि मळलेलं ध्यान बघून तिच्या आई बाबांना आणि शिक्षकांना तिची काळजी वाटायची, पण बिनधास्त डिप डिप नेहमी खेळकर, हसरी आणि आनंदी असायची!