
ऋषिराज तायडे
आपण सर्वांनीच जागतिक महिलादिन मोठ्या उत्साहात साजरा केला. दरवर्षी त्यानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जातो. हा काहीएक दिवसापुरता मर्यादित नसून, तो दररोजच करायला हवा. आजच्या डिजिटल युगात महिलांना त्यांच्या हक्कांविषयी माहिती असायला हवी, विविध क्षेत्रे पादाक्रांत करण्यासाठी नवनवी कौशल्ये विकसित करायला हवीत. मग त्यासाठी तुम्हाला माहिती देणारा चांगला मार्गदर्शक असणे आवश्यक आहे; परंतु तंत्रज्ञानाच्या युगात काही निवडक संकेतस्थळे नक्कीच कामात येतील.