एक बार कमिटमेंट कर ली ...

सोनाक्षी सिन्हा
Thursday, 13 June 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने "सेफ्टी झोन" वाचा "सकाळ पुणे टुडे"च्या "मैत्रीण" या पुरवणीत...

स्लिम फीट -  सोनाक्षी सिन्हा, अभिनेत्री
फिल्म इंडस्ट्रीमध्ये यायच्या आधी माझे वजन ९० किलो होते. इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करण्याआधी मी माझे वजन ३० किलोने कमी केले. यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. खाण्याच्या काही सवयीही सोडाव्या लागल्या. मला वजन कमी करण्यासाठी सलमान खानने प्रोत्साहन दिले. याच प्रोत्साहनामुळे मी माझे वजन कमी करू शकले. 

इतर अनेकांप्रमाणेच मलाही जीम आवडत नाही, मात्र मी एखादी गोष्ट मनापासून ठरवल्यावर मागे वळून पाहत नाही. ती पूर्ण मेहनत करून पूर्ण करतेच. चांगल्या वर्कआउटसाठी मी कार्डिओ, सायकलिंग, वेट ट्रेनिंग, स्वीमिंग व टेनिस खेळते. मी दिवसातून दोनदा मी जीमला जाते. शरीराच्या लवचिकतेसाठी योगासनेही करते. मी सुरवातीला जीम करताना किती किलो वजन कमी झाले, हे पाहत नव्हते. मी स्वतःला फील करत होते. मला स्वतःलाच बारीक वाटत होते. 

व्यवस्थित शेपमध्ये यायचे असल्यास डाएटही गरजेचे असते. मात्र, अन्न हे माझे पहिले प्रेम आहे. मी ‘फुडी’ आहे, त्यामुळे मला विविध प्रकार खायला आवडतात. मी नेहमीचेच अन्न खाते, परंतु आधीच्या तुलनेत त्याचे प्रमाण बरेच कमी आहे. मेटोबॉलिझम टिकवून ठेवण्यासाठी मी दर दोन तासाला खात असते. सकाळी उठल्यावर मी लिंबाचा रस आणि मध घातलेले कोमट पाणी पिते. नाश्‍त्याला कडधान्य, १ ग्लास कमी फॅट असलेले दूध व गव्हाचा टोस्ट खाते. त्यानंतर सुकामेवा आणि ग्रीन टी घेते. दुपारच्या जेवणात घरी बनवलेली पोळी, भाजी आणि सलाड खाते. 

संध्याकाळच्या नाश्‍त्यामध्ये १ कप ग्रीन टी व एक बाउल भरून फळे खाते. रात्रीच्या जेवणात डाळ, मिक्‍स भाज्या असणारी भाजी, एक चिकनचा अथवा माशाचा भाजलेला तुकडा खाते. रात्रीचे जेवण मी लवकर घेते; तसेच संध्याकाळी सहानंतर कार्बोहायड्रेट असणारे पदार्थ खाणे मी टाळते. तुम्ही मेहनत करत राहा, त्याचा एका रात्रीत परिणाम होईल, अशी अपेक्षा धरू नका. चांगल्या परिणामासाठी काही महिने, वर्षही जाऊ शकते. तुम्ही धीर धरणे गरजेचे असते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Celebrity Slim Fit sonakshi sinha