अभिनेत्री सुकीर्ती खंडपाल साकारणार मुख्य भूमिका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

प्रीमियर - सुकीर्ती खंडपाल 
देशातील सर्वांत धक्कादायक गुन्ह्यांबद्दल गेली सात वर्षे ‘सावधान इंडिया’ या शोच्या माध्यमातून जागरूकता निर्माण केली जात आहे. भारतीय दूरचित्रवाहिनीवरील पाच यशस्वी सीझन्सनंतर आता या शोसाठी खास निर्माण करण्यात आले पाच भागांची ‘स्पेशल क्राइम सीरिज’ सुरू होत आहे.

पहिली सीरिज ‘चौसर’मध्ये अभिनेत्री सुकीर्ती खंडपाल प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या सीरिजसाठी विद्या बालनचा बॉलिवूड थरारक चित्रपट ‘कहानी’वरून प्रेरणा घेण्यात आली आहे. सुडाची कथा असलेली ही नायिका एका राजकीय घराण्यात त्यांचा सर्वनाश करण्यासाठी प्रवेश करते. 

सुकीर्ती म्हणाली, ‘‘या भूमिकेबद्दल मी अतिशय उत्साही आहे. अशा प्रकारच्या प्रोजेक्‍टचा मी याआधी कधीही भाग बनलेले नाही. मला ‘सावधान इंडिया’मध्ये काम करायचे होते; कारण हा शो मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोचतो. हा शो देशातील लाखो प्रेक्षकांना प्रभावित करतो. मी गर्भवतीची भूमिका प्रथमच साकारत आहे. त्यामुळे हे माझ्यासाठी एक आव्हानच होते.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: celebrity sukirti kandpal maitrin supplement sakal pune today