बेली डान्सनं दिलं यश... (प्रणती राय प्रकाश)

प्रणती राय प्रकाश
मंगळवार, 23 एप्रिल 2019

"सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने "सेफ्टी झोन" वाचा "सकाळ पुणे टुडे"च्या "मैत्रीण" या पुरवणीत...."

सेलिब्रिटी टॉक
मी मूळची पाटण्याची आहे. माझे वडील आर्मीमध्ये. त्यामुळे मी खूप ठिकाणी फिरली आहे आणि प्रत्येक ठिकाणी मी शिक्षण घेतलं आहे. मी ‘मिस इंडिया २०१५’मध्ये भाग घेतला होता. त्यात मी सेमीफायनलपर्यंत पोचले होते. जगातल्या प्रत्येक मुलीला असं वाटतं की, ती जगातील सर्वांत सुंदर मुलगी असावी; माझ्यासाठीही ‘मिस इंडिया’ हेच होतं. ‘मिस इंडिया’मुळे माझ्यात खूपच बदल झाले. ‘मिस इंडिया’च्या फायनलला पोचल्यानंतर माझं कुटुंब फारच आनंदी होतं. त्यांना माझ्यावर फारच अभिमान वाटला. कारण, ‘मिस इंडिया’च्या फायनलपर्यंत पोचण्यासाठी मोठी मेहनत करावी लागते, हे सगळ्यांनाच माहीत होतं. त्या वेळी मी मुंबईत एकटीच राहत होती आणि माझं महाविद्यालयीन शिक्षण सुरू होतं. ‘मिस इंडिया’च्या फायनलला मी बेली डान्स केला होता. मात्र, माझे वडील फारच कडक असल्यानं त्यांना हे आवडत नव्हतं. गंमत म्हणजे, फायनलला जेव्हा मी बेली डान्स केला तेव्हा त्यांना माझा डान्स फारच आवडला आणि माझा अभिमानही वाटला. बेली डान्समुळे ‘मिस टॅलेंटेड’चं सबटायटल मिळालं होतं.  मला लहानपणापासून अभिनय क्षेत्रात करिअर करायचं होतं. त्यामुळं मी मुंबईतील एनआयएफटीत फॅशन कम्युनिकेशनचं शिक्षण पूर्ण केलं. मुंबईतली माहिती असल्यानं मला ऑडिशन देणं सोपं गेलं. मी अनेक ॲड फिल्मसाठी काम केलं आहे. मी ‘एम टीव्ही’वरच्या ‘इंडियाज नेक्‍स्ट टॉप मॉडेल सीझन २’मध्ये सहभागी झाले व जिंकले. मात्र, या प्रसिद्धीचा कामं मिळण्यासाठी उपयोग झाला नाही. मी आता ‘फॅमिली ऑफ ठाकूरगंज’ या चित्रपटासाठी काम करते आहे. मनोज झा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. मी ‘पॉईजन’ ही वेबसीरिजही करीत असून, त्यात मी आशूसिंह नावाची भूमिका करतेय.

मला नवीन लोकांना भेटायला खूप आवडतं. त्यांच्याकडून चांगल्या कल्पना ऐकायला मला आवडतात. माझी आई नेहमीच सांगते की, तुझा चेहरा खूप बोलका आणि निरागस आहे....


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Celebrity Talk Pranati Rai Prakash Maitrin supplement sakal pune today