आता अभिनयाची इनिंग खेळायचीये!  (शाल्मली खोलगडे)

शाल्मली खोलगडे
मंगळवार, 14 मे 2019

"सेलिब्रिटी टॉक - शाल्मली खोलगडे
सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने "सेफ्टी झोन" वाचा "सकाळ पुणे टुडे"च्या "मैत्रीण"या पुरवणीत...

मला माझ्या आईमुळेच गायनात करिअर करण्याची प्रेरणा मिळाली. वयाच्या आठव्या वर्षापासून माझ्या आईकडूनच मी संगीत शिकले. सोळाव्या वर्षापासून अनेक ठिकाणी परफॉर्म करण्यास सुरवात केली. मी २०१२मध्ये मी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं ‘इशकजादे’ चित्रपटातील ‘परेशान’ या गाण्यानं. मी २०१३मध्ये तमीळ चित्रपटासाठी ‘राजा राजा’ हे गाणं गायलं. बंगाली आणि तेलुगू चित्रपटांसाठी गाणी गाऊ लागले व २०१५मध्ये ‘टाइमपास २’ या मराठी चित्रपटातील ‘तू मिला’ या गाण्यानं मराठीत पदार्पण केलं. दारू देसी’, ‘अगं बाई’, ‘लत लग गई’ आदी अनेक गाणी गायली आहेत. 

सध्या मी ‘द डेस्टिनी-कालचक्र’ चित्रपटासाठी ‘जानेजां’ हे गाणं गायलं आहे. या गाण्याची चाल फार वेगळी आहे. या गाण्याला मेलडी गाण्याचा टच देण्याचा संगीतकारांचा प्रयत्न होता आणि अशा प्रकारची गाणी कधीच गायलेली नसलेल्या गायकांकडून त्यांना ते गाऊन घ्यायचं होतं. प्रसेनजीत महापात्रा यांनी या गाण्यासाठी माझी निवड केली. त्यांनी मला हे गाणं कसं आहे हे खूप चांगल्या पद्धतीनं समजावलं. स्वतःच्या स्टाइलनं गाण्याची संधी दिली. आजकाल बरेच जण वेस्टर्न म्युझिकचे, रॅप्सचे चाहते झाले आहेत, पण मला वाटतं, आजच्या गाण्यांतही मेलडी टिकून आहे. संगीतकार माझ्याकडं विशिष्ट प्रकारच्या गाण्याची मागणी करतो, तेव्हा त्याचं दडपण मला जाणवत नाही. रेकॉर्डिंगचं अर्धं काम माझ्या आवाजाच्या टेक्‍श्चरनंच होऊन जातं. 

मी बंगाली, गुजराती, हिंदी, मराठी, तमीळ, तेलुगू, मल्याळम सर्व भाषांमधील गाणी गायली आहेत, पण मला बंगाली आणि तेलुगू गाणी गायला जास्त आवडतात. त्यानंतर मला मराठी गाण्यांची आवड आहे. पण मला वाटतं, सगळ्याच भाषांमध्ये गाणं फार कठीण असतं. माझं स्वतंत्र गाणं तयार करण्याचं माझं स्वप्न आहे. त्यासाठी तयारी करते आहे. सध्या मी माझा हिंदी अल्बम तयार करते आहे. गाण्यानंतर आता खरं तर मी ॲक्‍टिंग करण्याचा विचार करते आहे. मी २००९मध्ये मी ‘तू माझा जीव’ या चित्रपटात अभिनय केला होता; पण आता मला अभिनयाची इनिंगदेखील खेळायची आहे. या वर्षी मी नक्कीच चित्रपटात ॲक्‍टिंग करेन... 

(शब्दांकन : स्नेहल सांबरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: celebrity talk Shalmali Kholgade maitrin supplement sakal pune today