
मला वाचन करायला फार आवडतं. सेटवरही माझ्यासोबत कायम एक पुस्तक असतं आणि घरी असल्यावरही वाचनासाठी मुद्दाम वेळ काढते. तुमचं घर नीट टापटीप असलं, की एक पॉझिटिव्हिटी आपली आपल्यालाच जाणवते.
मालिकांमध्ये काम करणाऱ्या कोणत्याही कलाकाराला सुट्टी मिळण्याचे दिवस फार कमी येतात. शिवाय तुम्हाला शनिवार-रविवारीच सुट्टी मिळेल असंही नाही. दिवसातला जास्त वेळ हा शूटिंग करण्यातच जातो आणि तसं असल्यामुळे घरच्यांना द्यायला फार वेळ मिळत नाही. म्हणूनच ज्या दिवशी मी घरी असते तो दिवस माझ्यासाठी पूर्णपणे फॅमिली टाइम असतो. सोबतच मला कोणत्या गोष्टी केल्याने आनंद मिळतो त्या सगळ्या गोष्टी मी त्या दिवशी करते. माझा तो दिवस रात्री बारा वाजताच सुरू होतो. माझ्या मुलाचं दिवसभर काम चालू असतं. त्यामुळं आईला उद्या सुट्टी आहे हे कळल्यावर तो रात्री माझ्याशी गप्पा मारायला येतो. तेव्हा अनेक वेगवेगळ्या गोष्टी, काही गंमती जमती शेअर केल्या जातात. शूटिंगच्या निमित्तानं रोज लवकर उठावं लागतं, परंतु घरी असल्यावर ती घाई नसते. त्या दिवशी थोडंसं उशिरा उठलं जातं. त्यानंतर चहा पीत मी माझ्या नवऱ्याशी गप्पा मारते, पेपर वाचते, सकाळच्या बातम्या बघते.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मला वाचन करायला फार आवडतं. सेटवरही माझ्यासोबत कायम एक पुस्तक असतं आणि घरी असल्यावरही वाचनासाठी मुद्दाम वेळ काढते. माझ्या सासूबाई, म्हणजे सुलभा देशपांडे यांना बागकामाची फार आवड होती आणि तीच परंपरा मी पुढं चालवत आहे. हे सगळं करत असताना मी त्यांच्याशी संवाद साधत असते आणि ते करणं मी अगदी मनापासून एन्जॉय करते. घरी असल्यावर आवर्जून मी आई-बाबांना, बहिणीला फोन करून त्यांच्याशी थोडा वेळ बोलते. त्यानंतरचा काही वेळ मी घर आवरण्याला देते. तुमचं घर नीट टापटीप असलं, की एक पॉझिटिव्हिटी आपली आपल्यालाच जाणवते. त्या दिवशी संध्याकाळी मी माझ्या आई-बाबांना भेटायला जाते, त्यांच्याशी छान गप्पा मारते, त्यांना काय हवं नको ते बघते. आमची भेट झाल्यावर त्यांनाही फ्रेश वाटतं आणि मलाही. रात्री मी, माझा नवरा आणि मुलगा आम्ही एकत्र जेवतो, तेव्हा पुन्हा एकदा आमच्या गप्पा होतात. या सगळ्या आपल्या माणसांना भेटून, त्यांच्याशी बोलून आनंद होतोच आणि रिफ्रेश होऊन पुन्हा पुढचे काही दिवस हेक्टिक शूट करण्याची ऊर्जासुद्धा मिळते. तोच आनंद आणि ऊर्जा घेऊन मी दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा एकदा कामाला लागायला सज्ज असते...
(शब्दांकन : राजसी वैद्य)