सेलिब्रिटी वीकेंड :  कुटुंबाला प्राधान्य 

मंगेश देसाई, अभिनेता 
Friday, 3 July 2020

शनिवार आणि रविवार मी  माझ्या फॅमिलीसाठी राखीव ठेवतो. त्यातच समजा कुणाचे काम आले,  तर नाही म्हणत नाही. कारण काम ही आपली पूजा आहे  आणि मी नेहमीच कामावर जिवापाड प्रेम केले आहे.  

‘एक अलबेला’, ‘लाल बत्ती’, ‘जजमेंट’ अशा चित्रपटांबरोबरच काही नाटकांमध्ये व मालिकांमध्येही मंगेश देसाईने काम केले आहे. भूमिका कोणतीही असली, तरी त्याने ती लिलया पेललेली आहे. लॉकडाउनच्या काळातही तो काही ना काही तरी करीत आहे.

नुकतीच त्याने निर्माते दीपक रुईया आणि दिग्दर्शक राजीव रईया यांची ‘येस आय वॉज राँग’ ही शॉर्ट फिल्म केली. ती मोबाईलवर शूट केली. वीकेंडबद्दल त्याला विचारले असता, तो म्हणाला, की शनिवार आणि रविवार मी माझ्या फॅमिलीसाठी राखीव ठेवतो. त्यातच समजा कुणाचे काम आले, तर नाही म्हणत नाही. कारण काम ही आपली पूजा आहे आणि मी नेहमीच कामावर जिवापाड प्रेम केले आहे. त्यामुळे कामाला मग ते शनिवारी किंवा रविवारी असले तरी करतो. त्या दोन दिवस काम नसले, तर शुक्रवारी रात्री माझे पाच-सहा मित्र आणि तेही वेगवेगळ्या क्षेत्रातील; आम्ही आमच्या फॅमिलीसह हॉटेलात जेवायला जातो. रात्री उशिरा घरी येतो आणि साहजिकच शनिवारी किंवा रविवारी उशिरा उठतो. विशेष म्हणजे रविवारी उशिरा झोपेतून उठल्यावर माझी पत्नी शलाका गरमागरम नाश्ता तयार करते. मात्र, जेवणासाठी काही स्पेशल डिश बनवायचे असले तर ते मी बनवितो.

हेही वाचा :  विकेंडला फक्त आराम!

माझी पत्नी शलाका शाकाहारी आणि मुलगा साहील मांसाहारी. मग त्याप्रमाणे मला स्पेशल डिश बनवावी लागते. मग बिर्याणी, अंडा करी असा बेत असतो. एखादा आवडीचा चित्रपट पाहायचा असल्यास आम्ही सगळे जातो. साहीलची परीक्षा असल्यास शलाका आणि मी चित्रपट पाहतो. मला वाचनाची फारशी आवड नाही, काही मोजकेच वाचन करतो. मात्र टीव्हीवर चित्रपट किंवा वेबसीरिज पाहतो. माझ्या अभ्यासाचे विषय असलेले चित्रपट आणि वेबसीरिज पाहतोच पाहतो. माझी शिल्लक कामे असली, तर ती करतो. फॅमिलीला अधिक वेळ देणे मी पसंत करतो आणि चित्रपट अधिक पाहतो. शॉपिंगलाही जवळच्याच कोणत्याही मॉलमध्ये फॅमिलीबरोबर जातो. अशा प्रकारे माझा वीकेंड कुटुंबाला प्राधान्य देणाराच असतो. 

हेही वाचा : मित्रांशी गप्पा आणि मनसोक्त खादाडी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Celebrity Weekend article mangesh desai actor