national sports
sakal
- जयेंद्र लोंढे, jayendra.londhe@esakal.com
भारतीय क्रीडा क्षेत्रात बदलाचे वारे जोरात वाहू लागले आहेत. राष्ट्रीय क्रीडा विधेयकाला ऑगस्ट महिन्यात लोकसभेत मंजुरी देण्यात आली. नजीकच्या काळात अंमलबजावणीही करण्यात येईल. भारतामध्ये क्रीडा कायदा निर्माण होणार आहे. यामुळे भारतामधील खेळांमध्ये पारदर्शकता येईल, भ्रष्टाचार दूर होईल, खेळाडूंना फक्त अन् फक्त खेळांवर फोकस ठेवता येईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही.