
- नितीन बिनेकर, nitin.binekar@esakal.com
स्वप्ने बघण्यासाठी नव्हे, तर नवा इतिहास घडवण्यासाठी असतात, असे म्हटले जाते. उंच हिमालयाच्या कुशीत, निसर्गाच्या आव्हानांवर मात करीत भारतीय रेल्वेने जम्मू-काश्मीरमध्ये जगातील सर्वात उंच चिनाब पूल उभारला आहे. हा पूल केवळ अभियांत्रिकी चमत्कार नाही, तर देशाच्या जिद्दीचा, स्वप्नांचा, एकात्मतेचा आणि प्रगतीला जोडणारा पूल ठरला आहे.
काश्मीर देशाच्या मुख्य प्रवाहाशी जोडले जावे, अशी इच्छा सर्वच स्तरावर व्यक्त होत होती. कधी काळी काश्मीरचे महाराजा हरी सिंह यांनीही तसे स्वप्न पाहिले होते. ब्रिटिशांच्या अनास्थेमुळे तेव्हा अपूर्ण राहिलेले स्वप्न आता मात्र तब्बल शतकभरानंतर भारतीय रेल्वेने साकारले आहे.