
डॉ. शैलेंद्र देवळाणकर saptrang@esakal.com
भारत-चीन सीमेवर तिबेटमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी ब्रह्मपुत्र नदीवर जगातलं सर्वांत मोठं धरण बांधायला परवानगी दिली आहे. या जलविद्युत प्रकल्पासाठी १३७ अब्ज डॉलरची तरतूद करण्यात आली आहे. भारतासाठी ही मोठ्या धोक्याची घंटा आहे. ब्रह्मपुत्र नदीवर महाकाय धरण बांधण्याची चीनची योजना म्हणजे भारताविरुद्ध अघोषित पाणीयुद्धच आहे. यामुळं ईशान्य भारताबरोबर बांगलादेशातही दुष्काळी परिस्थिती निर्माण होईल. यामुळं भारत चीनमध्ये सध्या चालू असलेल्या सीमावादाबरोबरच आता नदीच्या पाणीवाटपाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.