Gen Z Vlogger Story : माकड आणि मगरची नवी गोष्ट ; जेन झी व्लॉगर चिंटू, लोभी गुंतवणूकदार बायको आणि तुटलेली मैत्री

Modern Fables with Business Lessons : सोशल मीडियाच्या युगातील 'माकड आणि मगरीची' नवी गोष्ट! युनिकॉर्न कंपनीचा मालक चिंटू माकड आणि संधीसाधू लूची मगर यांच्यातील मैत्री आणि विश्वासघाताचा 'डिजिटल' अध्याय.
Modern Fables with Business Lessons

Modern Fables with Business Lessons

esakal

Updated on

सारिका चाटुफळे-कुलकर्णी - saptrang@esakal.com

एका नदीच्या काठावर एक चिंटू नावाचे माकड राहत असे. जेन झी चिंटू एक अत्यंत प्रसिद्ध व्लॉगर होता. नवनवीन ठिकाणे शोधून त्यांचे माहितीपर व्लॉग्स तयार करणे हे काम चिंटू करत असे. तो अतिशय हुशार, बोलघेवडा होता. मार्केटिंगमध्ये तर एकदम तज्ज्ञच होता. इन्स्टाग्राम, यूट्युब अशा कित्येक सोशल मीडिया साइट्सवर त्याचे व्लॉग्स प्रसिद्ध होऊ लागले. ''जांभूळ बाबा'' नावाने त्याने आपली मग स्वतःची कंपनी चालू केली.

चिंटू माकड अगदी जगन्मित्र होता. कोणाशीही त्याची फार लवकर मैत्री होत असे. पण आपल्या व्लॉगिंगसाठी त्याने कधीही कोणाच्या मैत्रीचा फायदा करून घेतला नाही. त्याच्या उत्तम मार्केटिंग तंत्राने आणि रंजक बोलण्याने त्याचे प्रेक्षक प्रभावित होऊ लागले. हळूहळू जांभूळ बाबा ही कंपनी यशाच्या शिखरावर पोहोचली. त्याला कोट्यवधी व्ह्यू मिळू लागले. कंपनी युनिकॉर्न होण्याच्या मार्गावर होती. चिंटू माकडाबरोबर आता अजून काही साथीदार या कंपनीला लाभलेले होते. प्रत्येकाच्या कष्टाचा मोबदला त्यांना पुरेपूर मिळत होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com