

Inspiring children's stories about disability
esakal
गौरी देशपांडे - gaurisdeshpande1294@gmail.com
स्कीटपो यूल गावातली ती एक सुंदर सकाळ होती. त्यादिवशी चुस्कीत सकाळी लवकर उठली. ती ज्या दिवसाची कित्येक वर्ष वाट बघत होती, तो दिवस अखेर आला होता. बिछान्याशेजारच्या खिडकीतून तिने बाहेर पाहिलं, तर लडाखमधल्या वसंत ऋतूचा तो दिवस आज अजूनच सुंदर भासत होता. अलुबुखारची बहरलेली झाडं, किड्यांच्या शोधत फिरू लागलेले नीलकंठ पक्षी, किती प्रसन्न दृश्य होतं ते!
चुस्कीतची अमा-ले म्हणजे आईसुद्धा उठली होती आणि ती स्वयंपाक घरात गुरगुर चहा बनवत होती. या सगळ्या रोजच्याच गोष्टी, रोजच्यासारखाच असल्या तरी तो दिवस चुस्कीतला अगदी खास वाटत होता.