

Pink Ball Test
esakal
क्रिकेट या खेळाच्या स्वरूपात, नियमात टप्प्याटप्प्याने बदल होताना दिसत आहेत. हा खेळ अधिकाधिक प्रेक्षककेंद्री बनवण्याचा प्रयत्न वारंवार करण्यात येत आहे. २०१५पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा बदल करण्यात आला. ऑस्ट्रेलियातील अॅडलेड येथे डे-नाईट कसोटी सामन्याचे आयोजन करण्यात आले. डे-नाईट म्हणजे काही प्रमाणात दिवसा अन् काही प्रमाणात प्रकाशझोतात खेळवला जाणारा कसोटी सामना. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने न्यूझीलंड संघाला पराभूत करीत विजयी श्रीगणेशा केला. तिथपासून ऑस्ट्रेलियाच्या डे-नाईट कसोटीतील साम्राज्याला सुरुवात झाली. त्यांनी आतापर्यंत १४ डे-नाईट कसोटी सामन्यांत विजय साकारले आहेत. फक्त वेस्ट इंडीजविरुद्धच्या ब्रिस्बेन येथील डे-नाईट कसोटीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या या देदीप्यमान कामगिरीत एका खेळाडूचे योगदान मौल्यवान ठरले. डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला ऑस्ट्रेलियाच्या घवघवीत यशाचे श्रेय द्यायलाच हवे.