
डॉ. सुरेश सावंत-editor@esakal.com
न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर हे शिक्षक - प्राध्यापक, क्रियाशील कार्यकर्ते-पदाधिकारी, अभ्यासू लेखक आणि वक्ते अशा विविध भूमिकांतून महाराष्ट्राला सुपरिचित होते. त्यांच्या हयातीत त्यांची ३५ पुस्तके प्रकाशित झाली होती. स्पष्ट तरीही संयमी, ठाम तरीही विवेकी अभिव्यक्ती हे त्यांच्या वाणीचे आणि लेखणीचे वैशिष्ट्य. अखंड वाचन, निरंतर चिंतन आणि सुबोध विवेचन हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायिभाव होता. चपळगावकर यांचा लेखनप्रवास हा ललित साहित्याकडून वैचारिक साहित्याकडे झालेला आहे.