
विवेक पंडित pvivek2308@gmail.com
२६ ऑक्टोबर १९७९ रोजी आम्ही ‘विधायक संसद’ची निर्मिती केली. ग्रामीण विकासाचं काम करायचा निर्णय घेतला. मालाड-मालवणीमधील ‘अलीतलाव झोपडपट्टी’त सेवादलातल्या काही तरुणांना घेऊन मी आणि विद्युल्लताने रात्रीचं प्रौढ शिक्षण सुरू केलं. शिबिरासाठी मालाडपासून फार दूर नसलेल्या दहिसर गावाची आम्ही निवड केली. तीन दिवसांचं शिबिर पूर्ण झाल्यावर विद्युल्लताने आणि मी ठरवलं, की आपण आपल्या कामाची सुरुवात इथूनच करू... शिबिर संपलं आणि आमचा निर्णय निश्चित झाला. ‘विधायक संसद’च्या रूपात आमच्या लोककल्याणकारी कामांचा श्रीगणेशा झाला...