

The Challenge of Injuries in a Player's Career
Sakal
भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यर आणि प्रतिका रावल या दोघांनाही मैदानावर खेळताना नुकते गंभीर दुखापतींना सामोरे जावे लागले. झेल घेताना श्रेयस अय्यरच्या बरगडीला दुखापत झाली आणि अंतर्गत रक्तस्राव झाला, तर प्रतिकाला क्षेत्ररक्षण करताना घोट्याला दुखापत झाली. दुखापती हा प्रत्येक खेळाडूच्या प्रवासाचा भाग असतो. दुखपतींनंतर खेळाडूंना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यशस्वी खेळाडूची व्याख्या तो एखाद्या दुखापतीतून कसा बाहेर पडतो, परत संघात कसा सहभागी होतो आणि त्याची कामगिरी टिकवून ठेवतो, हे जाणून घेणे आहे.