esakal | जाणून घ्या आजचे राशी भविष्य; तूळ राशीसाठी आनंदाचा दिवस
sakal

बोलून बातमी शोधा

daily horoscope 21 february 2020 marathi

पंचांग 21 फेब्रुवारी 2020 
शुक्रवार ः माघ कृष्ण 13, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, सूर्योदय 7.02, सूर्यास्त 6.37, चंद्रोदय पहाटे 5.22, चंद्रास्त दुपारी 4.49, महाशिवरात्री, भारतीय सौर फाल्गुन 2, शके 1941.

जाणून घ्या आजचे राशी भविष्य; तूळ राशीसाठी आनंदाचा दिवस

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मेष  : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. दैनंदिन कामास विलंब लागण्याची शक्यता आहे.

वृषभ : जिद्द वाढणार आहे. मनोबलाच्या जोरावर कामे यशस्वी कराल. आत्मविश्वामसपूर्वक वागाल. 

मिथुन : आज तुमचे कामामध्ये लक्ष लागणार नाही. एखादी मानसिक चिंता राहील. कामाचा ताण व दगदग जाणवेल. 

कर्क : वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. भागीदारीमध्ये फायदा होईल. मनोबल उत्तम राहील.

सिंह : तुमची चिडचिड होणार आहे. प्रवासात व वाहने चालवताना काळजी घ्यावी. एखाद्या मनाविरुद्ध घटनेला सामोरे जावे लागेल.

कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. प्रियजनांबरोबर सुसंवाद साधाल. मनोबल व आत्मविश्वाुस उत्तम राहील.

तूळ : तुमचे मन आनंदी राहील. आशावादीपणाने कार्यरत राहणार आहात. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील.

वृश्चिक : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. प्रवास होणार आहेत. आरोग्य उत्तम राहील.मनोबल उत्तम राहील.

धनू : आर्थिक कामामध्ये सुयश लाभणार आहे. प्रवासाचे योग येणार आहेत. कौटुंबिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

मकर : तुमचा प्रभाव वाढणार आहे. दैनंदिन कामात सुयश लाभेल. चिकाटीने कार्यरत रहाल. प्रवासाचे योग येतील. 

कुंभ : मानसिक अस्वस्थता राहणार आहे. काहींना नैराश्यल जाणवेल. कामामध्ये चूक होण्याची शक्योता आहे. 

मीन : मित्रमैत्रिणी भेटतील. नोकरीतील सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. व्यवसायात आर्थिक लाभ होतील.