esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : ०१ जुलै
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
बुधवार - आषाढ शु. ११, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तुला, सूर्योदय ६.०३, सूर्यास्त ७.१६, देवशयनी एकादशी, चंद्रोदय दु. ३.३१, चंद्रास्त रा. २.३१, भारतीय सौर १०, शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : ०१ जुलै

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
बुधवार - आषाढ शु. ११, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तुला, सूर्योदय ६.०३, सूर्यास्त ७.१६, देवशयनी एकादशी, चंद्रोदय दु. ३.३१, चंद्रास्त रा. २.३१, भारतीय सौर १०, शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
महाराष्ट्र कृषी दिन । डॉक्‍टर्स डे 

१९१३ - हरितक्रांतीचे व रोजगारहमीचे जनक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्म.
१९३८ - आंतरराष्ट्रीय कीर्तिचे बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचा जन्म. त्यांना ‘पद्मविभूषण’ सन्मानाने गौरविण्यात आले.
१९३८ - लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी दादासाहेब खापर्डे यांचे निधन. त्यांना ‘वऱ्हाडचे नबाब’ म्हणून ओळखत असत.
१९६२ - आधुनिक पश्‍चिम बंगालचे शिल्पकार, आंतरराष्ट्रीय कीर्तिचे निष्णात डॉक्‍टर व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बिधनचंद्र रॉय यांचे निधन. १९४२ ते १९४४ या  काळात ते कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरू होते. सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ या सन्मानाने गौरविले.
१९६९ - विख्यात कीर्तनकार मुरलीधरबुवा निजामपूरकर यांचे निधन.
१९८९ - प्रसिद्ध कवी व शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य ग. ह. पाटील यांचे निधन. ‘माझ्या मामाची रंगीत गाडी’, ‘डराव डराव का ओरडता उगाच राव’ अशी त्यांची बालगीते लोकप्रिय आहेत.
१९९३ - पश्‍चिम रेल्वेच्या उपनगरी विभागातील विरारपासून डहाणूपर्यंत महाराष्ट्रात प्रथमच डिझेल मल्टिपल युनिटचा शुभारंभ.
१९९४ - मराठी रंगभूमीवरील दिग्दर्शक, नेपथ्यकार, प्रकाशयोजक व संघटक राजाभाऊ नातू यांचे निधन.
२००४ - पुण्याचे माजी खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठल तुपे यांचे निधन.

दिनमान -
मेष :
जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. काहींना सुसंधी लाभेल.
वृषभ : प्रवास शक्‍यतो टाळावेत. महत्त्वाच्या कामांसाठीच बाहेर पडावे. 
मिथुन : वैवाहिक सौख्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
कर्क : प्रॉपर्टीच्या व्यवहारांमध्ये लक्ष देऊ शकाल. विद्यार्थ्यांना हळूहळू यश लाभेल. 
सिंह : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. काहींना संधी लाभेल.
कन्या : व्यवसायातील कामकाजाकडे लक्ष देऊ शकाल. तुमचे मनोबल वाढणार आहे. तूळ : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.
वृश्‍चिक : शासकीय कामे रखडतील. काहींना मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. 
धनू : विद्यार्थ्यांना नवी दिशा नवा मार्ग दिसेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. 
कुंभ : प्रॉपर्टीसंदर्भात काही नवीन प्रस्तावांवर विचारविनिमय करू शकाल. 
मीन : मुलामुलींबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. वादविवाद टाळावा.