esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 01 मे 2021

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology
आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 01 मे 2021
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

शनिवार : चैत्र कृष्ण ५, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, चंद्रोदय रात्री ११.४०, चंद्रास्त सकाळी ९.५२, सूर्योदय ६.०८, सूर्यास्त ६.५५, महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन, श्री चंद्रला देवीचा उत्सव, भारतीय सौर वैशाख ११ शके १९४३.

दिनविशेष -

महाराष्ट्र दिन । जागतिक कामगार दिन । मे दिन । छोटा परिवार दिन (महाराष्ट्र राज्य) । जागतिक हास्य दिन (मे महिन्याचा पहिला रविवार)

१८९७ - स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना केली.

१९२० - ज्येष्ठ गायक मन्ना डे यांचा जन्म. त्यांचे मूळ नाव प्रबोधचंद्र डे.

१९२२ - भारताचे पहिलेवहिले विश्‍वविजेते बिलियर्डसपटू विल्सन जोन्स यांचा जन्म. १२ वेळा राष्ट्रीय बिलियर्डसचे अजिंक्‍यपद आणि पाच वेळा राष्ट्रीय स्नूकरचे विजेतेपद त्यांनी मिळविले. सरकारने त्यांना सर्वोत्कृष्ट खेळाडू, अर्जुन, पद्मश्री, द्रोणाचार्य या पुरस्कारांनी गौरविले.

१९४७ - पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हरिजनांना खुले व्हावे यासाठी साने गुरुजींनी उपोषण सुरू केले.

१९६० - द्वैभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन स्वतंत्र राज्ये निर्माण झाली.

१९७२ - भारतातील कोळसा खाणींचे राष्ट्रीयीकरण.

१९७२ - प्रसिद्ध उद्योगपती आणि राजकीय नेते कमलनयन बजाज यांचे निधन. जमनालाल बजाज यांचे ते चिरंजीव. बजाज ऑटो, बजाज इलेक्‍ट्रिकल्स, उदयपूर सिमेंट वगैरे कंपन्यांचे ते अध्यक्ष होते.

दिनमान -

मेष : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. आरोग्य उत्तम राहील. उसनवारी वसूल होईल.

वृषभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कामाचा ताण व दगदग जाणवेल.

मिथुन : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

कर्क : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह : तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील.

कन्या : प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

तुळ : जिद्दीने कार्यरत राहाल. नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील.

वृश्‍चिक : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

धनु : विरोधकांवर मात कराल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मकर : प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करावेत.

कुंभ : नवीन स्नेहसंबंध जुळतील. रखडलेली आर्थिक कामे मार्गी लागतील.

मीन : वरिष्ठांबरोबर मतभेद संभवतात. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.