esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 01 ऑक्टोबर
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
गुरुवार - अधिक आश्विन शुद्ध १५, चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय ६.२६, सूर्यास्त ६.२१, चंद्रोदय सायंकाळी ६.२१, चंद्रास्त सकाळी ६.३८, पौर्णिमा समाप्ती रात्री २.३४, भारतीय सौर ९ शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 01 ऑक्टोबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
गुरुवार - अधिक आश्विन शुद्ध १५, चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय ६.२६, सूर्यास्त ६.२१, चंद्रोदय सायंकाळी ६.२१, चंद्रास्त सकाळी ६.३८, पौर्णिमा समाप्ती रात्री २.३४, भारतीय सौर ९ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
ज्येष्ठ नागरिक दिन । जागतिक रक्तदान दिन
१८५४ : भारतातील पहिले टपाल तिकीट प्रकाशित झाले. त्यात पांढऱ्या कागदावर निळ्या रंगात व्हिक्‍टोरिया राणीचे चित्र छापले होते.
१९०५ : लेखिका मालतीबाई बेडेकर यांचा जन्म. ‘कळ्यांचे निःश्वास’ हे पुस्तक त्यांनी विभावरी शिरूरकर या टोपणनावाने लिहिले.
१९३१ : मराठीतील नाट्यछटा या वाङ्‌मयप्रकाराचे जनक ‘दिवाकर’ यांचे निधन. त्यांचे पूर्ण नाव शंकर काशिनाथ गर्गे. 
१९९५ : नामवंत उद्योगपती, फिरोदिया उद्योगसमूहातील कंपन्यांचे अध्यक्ष व मराठा चेंबरचे माजी अध्यक्ष हस्तिमल कुंदनमल फिरोदिया यांचे निधन. 
१९९५ : प्रसिद्ध उद्योगपती व बिर्ला उद्योगसमूहाचे प्रमुख आदित्य विक्रम बिर्ला यांचे निधन.
१९९५ : प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक आर. के. नय्यर यांचे निधन.
१९९६ : मद्रास शहराचे नामांतर करून ‘चेन्नई’ असे नामकरण करण्यात आले.
१९९६ : प्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ आणि डेक्कन कॉलेजचे माजी संचालक प्रा. शांताराम भालचंद्र देव यांचे निधन.

दिनमान -
मेष :
आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने चालवताना काळजी घ्यावी.
वृषभ : संततीच्या बाबतीत एखादी चांगली घटना घडेल. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. 
मिथुन : शासकीय कामे मार्गी लागतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रगती होईल.
कर्क : काहींना गुरूकृपा लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल.
सिंह : मानसिक अस्वस्थता जाणवेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. 
कन्या : वादविवाद टाळावेत. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे. 
तुळ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. हाताखालील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल. 
वृश्‍चिक : संततीच्या तक्रारी जाणवतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
धनु : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा. 
मकर : नातेवाईकांबरोबर मतभेदाची शक्यता आहे. कामानिमित्त छोटे प्रवास होतील. 
कुंभ : आर्थिक लाभ होतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. जुनी येणी वसूल होतील.
मीन : आत्मविश्‍वास वाढेल. हाती घेतलेली कामे पूर्णत्वास न्याल. प्रवास सुखकर होतील.

Edited By - Prashant Patil