esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : ०२ जुलै
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
गुरुवार - आषाढ शु. १२, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्‍चिक, सूर्योदय ६.०४, सूर्यास्त ७.१६, प्रदोष, चंद्रोदय दु.४.३३, चंद्रास्त प.३.१७, भारतीय सौर ११, शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : ०२ जुलै

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
गुरुवार - आषाढ शु. १२, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्‍चिक, सूर्योदय ६.०४, सूर्यास्त ७.१६, प्रदोष, चंद्रोदय दु.४.३३, चंद्रास्त प.३.१७, भारतीय सौर ११, शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८८० - मराठी रंगभूमीवरील श्रेष्ठ गायक अभिनेते गणपतराव बोडस यांचा जन्म. त्यांचे पूर्ण नाव गणेश गोविंद बोडस. त्यांनी १९१३ मध्ये बालगंधर्व व गोविंदराव टेंबे यांच्यासह ‘गंधर्व नाटक मंडळी’ची स्थापना केली.
१९२८ - उडिया भाषेतील श्रेष्ठ कवी, कादंबरीकार व समीक्षक नंदकिशोर बल यांचे निधन. नंदकिशोर हे ‘पल्ली‘ कवी म्हणजे ग्रामीण कवी म्हणून प्रसिद्ध होते.
१९५० - स्वातंत्र्यपूर्व काळातील समाजवादी चळवळीतील लोकप्रिय युवक नेते आणि मुंबईचे माजी महापौर युसुफ मेहेरअली यांचे निधन. 
१९९३ - कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार आणि लेखक उदयशंकर यांचे निधन.
१९९५ - विद्यापीठ अनुदान मंडळाचे माजी अध्यक्ष व ‘इंडियन कौन्सिल फॉर सोशल रिसर्च’ चे अध्यक्ष प्रा.जी.राम रेड्डी यांचे निधन.
१९९६ - जबरदस्त आवाजाने संवादफेक करुन, प्रेक्षकांना खूष करणारे ज्येष्ठ अभिनेते ‘जानी’ राजकुमार यांचे निधन. 
१९९९ - माफियांच्या जीवनावरील ‘गॉडफादर’ या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक  व ‘सुपरमॅन’, ‘अर्थक्वेक’ अशा गाजलेल्या चित्रपटांचे पटकथालेखक मारिओ पुझो यांचे निधन.
२००० - ‘युरो-२०००’ या युरोपीय फुटबॉल स्पर्धेत विश्वकरंडक विजेत्या फ्रान्सने ‘गोल्डन गोल’द्वारे इटलीचा २-१ असा पराभव करुन विजेतेपद मिळविले.
२००१ - बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे जगातील सर्वांत मोठा बौद्ध स्तूप सापडला, त्याची उंची १०४ फूट आहे.
२००३ - राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाला देशपातळीवरील मानाचा ‘सरदार पटेल सर्वोत्कृष्ट कृषी विद्यापीठ पुरस्कार’ जाहीर.

दिनमान -
मेष : आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. महत्त्वाचे निर्णय काळजीपूर्वक घ्यावेत. 
वृषभ : जोडीदाराबरोबर सुसंवाद साधू शकाल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव राहील.
मिथुन : काहींना सतत एखादी चिंता लागून राहील. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. 
कर्क  : अनेकांचे सहकार्य लाभेल. जनसंपर्क वाढणार आहे. प्रवासात काळजी घ्यावी.
सिंह : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. अनेकांचे सहकार्य लाभेल. 
कन्या : काहींना सुसंधी लाभेल. व्यवसायामध्ये विचारविनिमय करून निर्णय घेऊ शकाल.
तूळ : वरिष्ठांचे व थोरा-मोठ्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. आरोग्य चांगले राहील.
वृश्‍चिक : गेल्या काही दिवसांपेक्षा दिवस चांगला जाईल. आत्मविश्‍वास वाढेल.
धनू : प्रवास टाळावेत. काहींचा आध्यात्मिक क्षेत्राकडे कल राहील. 
मकर : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. विरोधकावर मात कराल.
कुंभ : व्यवसायामध्ये उलाढाल होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
मीन : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. मुलामुलींबरोबर सुसंवाद साधू शकाल.