esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 03 मे 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 03 मे 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

सोमवार : चैत्र कृष्ण ७, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, चंद्रोदय रात्री १.२६, चंद्रास्त सकाळी ११.५५, सूर्योदय ६.०७, सूर्यास्त ६.५५, कालाष्टमी, भारतीय सौर वैशाख १३ शके १९४३.

दिनविशेष -

१८९८ : चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर यांचा जन्म.

१९१२ : उर्दू कादंबरीचे जनक म्हणून ओळखले जाणारे नामवंत उर्दू लेखक नझीर अहमद यांचे निधन.

१९१३ : पहिला भारतीय मूकचित्रपट ‘राजा हरिश्‍चंद्र’ मुंबईत प्रदर्शित झाला.

१९६९ : भारताचे तिसरे राष्ट्रपती व नामवंत शिक्षणतज्ज्ञ डॉ. झाकिर हुसेन यांचे निधन. अलिगड येथे ‘जामिया मिलिया’ या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. ‘पद्मविभूषण’ व ‘भारतरत्न’ हे सन्मान त्यांना देण्यात आले होते.

१९९६ : प्रसिद्ध व्यंगचित्रकार वसंत गवाणकर यांचे निधन.

१९९८ : जगातील सर्वांत मोठे जहाज ‘द ग्रॅंड प्रिन्सेस’ने इटलीच्या ट्रिएस्ट बंदरातून पहिल्या सागरसफरीला सुरवात केली.

२००० : कुटुंबनियोजनाच्या कार्यामध्ये एकेकाळी अनन्यसाधारण कामगिरी बजावणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका शकुंतलाबाई परांजपे यांचे निधन.

२००१ : पुण्याचे माजी महापौर, मोटोक्रॉस संघटक अली सोमजी यांचे निधन. क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी त्यांना मरणोत्तर ‘शिवछत्रपती पुरस्कार’ देण्यात आला.

दिनमान -

मेष : सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

वृषभ : आरोग्य चांगले राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

मिथुन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

सिंह : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.

कन्या : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. व्यवसायात प्रगतीचे वातावरण राहील.

तूळ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

वृश्‍चिक : हितशत्रूंवर मात कराल. जिद्दीने कार्यरत राहाल.

धनू : व्यवसायात तुम्ही घेतलेले निर्णय अचूक ठरतील. अनुकूलता लाभेल.

मकर : मानसिक अस्वस्थता संपेल. अपेक्षित सहकार्य लाभेल.

कुंभ : आध्यात्माकडे कल राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मीन : संततिसौख्य लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

loading image