आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 03 सप्टेंबर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 September 2020

पंचांग -
गुरुवार - भाद्रपद कृ.1, चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.22, सूर्यास्त 6.47, चंद्रोदय सायं. 7.44, चंद्रास्त स. 7.08, भारतीय सौर 12, शके 1942.

पंचांग -
गुरुवार - भाद्रपद कृ.1, चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.22, सूर्यास्त 6.47, चंद्रोदय सायं. 7.44, चंद्रास्त स. 7.08, भारतीय सौर 12, शके 1942.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९१६ - श्रीमती ॲनी बेझंट यांनी होमरूल लीगची स्थापना केली. 
१९५३ - प्रख्यात तबलावादक लक्ष्मणराव ऊर्फ खाप्रूमामा पर्वतकर यांचे निधन. गोव्यातील ‘घुमट’ हे तालवाद्य ते अत्यंत कौशल्याने वाजवीत. त्यांनी लयकारीमध्ये विविध नावीन्यपूर्ण प्रयोग केले आणि लौकिक मिळविला.
१९९७ - हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार अंजान यांचे निधन. बनारसमध्ये जन्मलेल्या अंजान यांचे मूळ नाव लालजी पांडे असे होते. 
१९९७ - ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि कम्युनिस्ट नेते एम. फारुकी यांचे निधन.
२००० - गोवा विधानसभेचे पहिले सभापती व ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर यांचे निधन.
२००० - पै-पै जमवून शैक्षणिक संस्थांना लाखो रुपयांच्या देणग्या देणारे सामाजिक कार्यकर्ते स्टुअर्ट अंकल यांचे निधन. बॉनपेच पीटर स्टुअर्ट हे मूळचे ओरिसामधील कटक जिल्ह्यातील डगराशी या गावचे राहणारे, मात्र रेल्वेत नोकरी लागल्याने ते १९५६ मध्ये महाराष्ट्रात आले.
२००० - भारताचे आंतरराष्ट्रीय थाळीफेकपटू अजित भादुरिया यांचे निधन.
२००३ - टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. रा. न. अरळीकट्टी यांना राष्ट्रीय संस्कृत पंडित पुरस्कार जाहीर. संस्कृत भाषेचा त्यांचा खास अभ्यास आहे. 
२००३ -  प्रख्यात काश्‍मिरी कवी रहमान राही यांना मध्य प्रदेश सरकारचा ‘कबीर सन्मान’ जाहीर.

दिनमान -
मेष  :
आपल्या कार्यक्षेत्रात अधिकारपद लाभेल. आत्मविश्‍वास, मनोबल वाढेल. 
वृषभ : आत्मविश्‍वास वाढेल. नोकरीत बढतीची शक्यता आहे. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.
मिथुन : मानसन्मान, कीर्ती लाभेल. हाती घेतलेले काम पूर्णत्वास न्याल.
कर्क  : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. चिडचिडेपणा, मानसिक अस्वस्थता जाणवेल.
सिंह : व्यवसायात यश लाभेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कन्या : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. वैवाहिक सौख्य लाभेल. व्यवसायात यश लाभेल.
तुळ : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
वृश्‍चिक  : सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. तुमचे मते इतरांना पटवून द्याल. 
धनु : वादविवादात टाळावेत. आपली मते इतरांना पटवून द्याल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
मकर  : अचानक धनलाभाची शक्यता आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.
कुंभ : आजचा दिवस आनंदात जाईल. खर्चाचे नियोजन कराल. कुटुंबासाठी खर्च कराल.
मीन : मानसिक अस्वस्थता जाणवेल. आपली मते इतरांना पटवून द्याल.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daily Horoscope and Panchang of 03rd September 2020