esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 04 मे 2021

बोलून बातमी शोधा

Horoscoep and Astrology
आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 04 मे 2021
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

मंगळवार : चैत्र कृष्ण ८, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर/कुंभ, चंद्रोदय रात्री २.११, चंद्रास्त दुपारी १२.५३, सूर्योदय ६.०६, सूर्यास्त ६.५६, भारतीय सौर वैशाख १४ शके १९४३.

दिनविशेष -

१७९९ - ‘म्हैसूरचा वाघ’ म्हणून ओळखला जाणारा टिपू सुलतान इंग्रजांशी झालेल्या शेवटच्या युद्धात मारला गेला.

१८४९ - थोर बंगाली साहित्यिक व कवी ज्योतिंद्रनाथ टागोर यांचा जन्म. लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्याचा त्यांनी बंगालीत अनुवाद केला होता.

१८५४ - भारतातील पहिले टपाल तिकीट प्रकाशित झाले.

१९८० - चतुरस्र मराठी लेखक, कवी व पत्रकार अनंत काणेकर यांचे निधन. मुंबईतील ‘नाट्यमन्वंतर’ या प्रयोगशील संस्थेचे ते एक संस्थापक होते. त्यांना ‘पद्मश्री’ व ‘सोव्हिएत लॅंड नेहरू पुरस्कार’ हे सन्मान मिळाले होते.

१९८९ - सर्व पंचायत समित्यांमध्ये महिलांसाठी तीस टक्के जागा राखीव ठेवल्या जातील, अशी पंतप्रधान राजीव गांधी यांनी घोषणा केली.

१९९५ - ‘बाँबे’चे ‘मुंबई’ असे नामकरणाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला.

१९९६ - जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताला सहा पदके. एन.कुंजुरानीदेवीला दोन रौप्यपदके.

दिनमान -

मेष : नवीन व्यवसाया सुरू करू शकाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

वृषभ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. तुमचा जनसंपर्क वाढेल.

मिथुन : कामाचा ताण जाणवेल. व्यवसायात नवीन तंत्र अंमलात आणू शकाल.

कर्क : अपेक्षित सुसंधी लाभेल. आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल.

सिंह : हितशत्रुंवर मात कराल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता आहे.

कन्या : नवीन परिचय होतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

तुळ : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. कामे मार्गी लागतील.

वृश्‍चिक : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. कामे मार्गी लागतील.

धनु : आर्थिक लाभ होतील. व्यवसायामध्ये प्रगतीचे वातावरण राहील.

मकर : अपेक्षित संधी लाभेल. मान व प्रतिष्ठा लाभेल.

कुंभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. मनोरंजनाकडे कल राहील.

मीन : तुमचा जनसंपर्क वाढेल. अपेक्षित गाठीभेटी होतील.