esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 04 ऑक्टोबर
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
रविवार - अधिक आश्विन कृष्ण २, चंद्रनक्षत्र अश्विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ६.२६, सूर्यास्त ६.१९, चंद्रोदय रात्री ८.०३, चंद्रास्त सकाळी ८.१३, भारतीय सौर १२ शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 04 ऑक्टोबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
रविवार - अधिक आश्विन कृष्ण २, चंद्रनक्षत्र अश्विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ६.२६, सूर्यास्त ६.१९, चंद्रोदय रात्री ८.०३, चंद्रास्त सकाळी ८.१३, भारतीय सौर १२ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
जागतिक प्राणी सुरक्षादिन 

१९१६ : नामवंत अर्थशास्त्रज्ञ व प्राध्यापक धनसुखलाल तुलसीदास लाकडावाला यांचा जन्म. सार्वजनिक अर्थकारण व आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या क्षेत्रातील अधिकारी व्यक्तींमध्ये लाकडावाला यांची गणना होते. अर्थशास्त्र विषयावरील भरीव कार्याबद्दल त्यांना दोन वेळा दादाभाई नौरोजी पुरस्कार देण्यात आला.
१९२१ : संगीतसूर्य म्हणून ओळखले जाणारे गायक नट केशवराव भोसले यांचे निधन. ‘हाच मुलाचा बाप’, ‘संन्याशाचा संसार’ इ.नाटकातील त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या. 
१९५७ : सोव्हिएत रशियाने स्फुटनिक-१ हा उपग्रह अंतराळात सोडून अंतराळयुगाचा प्रारंभ केला.
१९५९ : रशियाच्या लूनिक -३ या अंतराळयानाने चंद्राला प्रदक्षिणा घालून पृथ्वीवरून न दिसणाऱ्या भागाची छायाचित्रे घेतली.
१९८२ : कवी सोपानदेव चौधरी यांचे निधन. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे ते पुत्र. बहिणाबाईंच्या अहिराणी भाषेतील काव्याचे संकलन करून सोपानदेवांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली. 
१९९३ : भारतीय चित्रपटसृष्टीत स्टंटपटाचा नायक म्हणून दोन दशके चित्रपट रसिकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता जॉन कावस यांचे निधन.
१९९३ : प्रसिद्ध छायाचित्रकार राधू कर्मकार यांचे निधन. राज कपूरच्या अनेक यशस्वी बोलपटांचा हा कसबी कलाकार त्याच्या अप्रतिम छबीकलेने चित्रपट जगतात नामवंत झाला होता.
१९९५ : हत्या झालेले पंजाबचे मुख्यमंत्री बेअंतसिंग आणि नागालॅंड गांधी आश्रमाचे संस्थापक सचिव नटवर ठक्कर यांची इंदिरा गांधी पुरस्कारासाठी निवड.
१९९७ : तिहार तुरुंगामध्ये असलेली स्थिती सुधारण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल ज्येष्ठ महिला पोलिस अधिकारी किरण बेदी यांना चौदा हजार डॉलरचा ‘जोसेफ बॉईस’ पुरस्कार देण्यात आला.
२००१ : जगात सर्वांत मोठी असलेली खोडदमधील रेडिओ दुर्बीण ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा मूलभूत संशोधन केंद्राचे अध्यक्ष रतन टाटा यांच्या हस्ते सर्व शास्त्रज्ञांसाठी खुली.

दिनमान -
मेष :
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आजचा दिवस आनंदात जाईल. वादविवाद टाळावेत.
वृषभ : अकारण खर्च होतील. कामाचा ताण जाणवेल. प्रवास शक्यतो टाळावेत.
मिथुन : अनेकांबरोबर सुसंवाद साधाल. संततिसौख्य लाभेल. नवीन परिचय होतील.
कर्क : व्यवसायात उत्तम स्थिती सार्वजनिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. दैनंदिन कामात सुयश लाभेल.
सिंह : आरोग्य उत्तम राहील. आपली मते इतरांना पटवून द्याल. काहींना गुरूकृपा लाभेल.
कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
तुळ : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
वृश्‍चिक : वाहने सावकाश चालवावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
धनु : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. हाती घेतलेल्या कामात यश लाभेल.
मकर : व्यवसायात गुंतवणुकीस दिवस चांगला आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. 
कुंभ : आपली मते इतरांना पटवून द्याल. तुमच्या कर्तृत्त्व गुणास वाव मिळेल.
मीन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. विरोधकांवर मात कराल. गुरूकृपा लाभेल.

Edited By - Prashant Patil