esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 04 ऑक्टोबर 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 04 ऑक्टोबर 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

सोमवार : भाद्रपद कृष्ण १३, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह, चंद्रोदय पहाटे ५.०८, चंद्रास्त सायंकाळी ५.०९, सोमप्रदोष, शिवरात्री, त्रयोदशी श्राद्ध, युगादि, भारतीय सौर आश्विन १२ शके १९४३.

दिनविशेष -

१९१३ - किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका सरस्वतीबाई राणे यांचा मिरज येथे जन्म. संगीत रंगभूमी, पार्श्‍वगायन यांवर त्यांनी ठसा उमटविला.

१९१४ - ज्ञानेश्‍वरीतील लौकिक सृष्टी या ग्रंथाला साहित्य अकादमीचे पारितोषिक व ज्ञानेश्‍वरी ः स्वरूप आणि तत्त्वज्ञान या ग्रंथास प्रियदर्शनी पुरस्कार मिळवलेले मराठीतील ज्येष्ठ संशोधक-समीक्षक प्रा. मधुकर वासुदेव ऊर्फ म. वा. धोंड यांचा जन्म.

१९१६ - अर्थशास्त्रज्ञ धनसुखलाल तुलसीदास लाकडावाला यांचा जन्म.

१९२१ - संगीतसूर्य म्हणून ओळखले जाणारे गायक नट केशवराव भोसले यांचे निधन.

दिनमान -

मेष : तुमचा इतरांवर बौद्धिक प्रभाव राहील. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील.

वृषभ : सार्वजनिक क्षेत्रात तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल.

मिथुन : मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील.

कर्क : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. काहींना अचानक धनलाभ.

सिंह : महत्त्वाची कामे पार पडतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. हितशत्रूंवर मात कराल.

तूळ : प्रियजनांचा सहवास लाभेल. संततिसौख्य लाभेल.

वृश्‍चिक : जिद्दीने कार्यरत रहाल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

धनू : प्रवास सुखकर होतील. गुरुकृपा लाभेल.

मकर : मानसिक अस्वस्थता जाणवेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

कुंभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल.

मीन : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.

loading image
go to top