esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : ०५ जुलै

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
रविवार - आषाढ शु. १५, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू, सूर्योदय ६.०४, सूर्यास्त ७.१६, गुरुपौर्णिमा, चंद्रोदय सायं. ७.३४, चंद्रास्त प. ५.५८, भारतीय सौर १४, शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : ०५ जुलै
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
रविवार - आषाढ शु. १५, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू, सूर्योदय ६.०४, सूर्यास्त ७.१६, गुरुपौर्णिमा, चंद्रोदय सायं. ७.३४, चंद्रास्त प. ५.५८, भारतीय सौर १४, शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९८२ - भक्तिप्रधान, पौराणिक, ऐतिहासिक व सामाजिक चित्रपटांचा अविभाज्य घटक बनून राहिलेले एक महान गीतकार  भरत व्यास यांचे निधन.
१९८४ - इंडियन एअरलाईन्सच्या श्रीनगर ते दिल्ली या विमानाचे शीख अतिरेक्‍यांनी अपहरण करून लाहोरला नेले. या विमानात २२५ प्रवासी व ९ कर्मचारी होते.
१९९३ - माजी केंद्रीय कृषीराज्यमंत्री पी. के. पटेल यांचे निधन. ते गुजरातमधील सहकारी चळवळीचे प्रणेते होते. 
१९९४ - मल्याळीतील ज्येष्ठ लेखक व स्वातंत्र्यसेनानी वैक्कोम मुहंमद बशीर यांचे कोझिकोड येथे निधन. बशीर ‘बेपोर सुलतान’ या नावाने मल्याळी साहित्य जगतात ते प्रसिद्ध होते.
१९९६ - संरक्षणमंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम व अवकाश आयोगाचे सदस्य एन. पंत यांना प्रतिष्ठेचा ‘आर्यभट्ट पुरस्कार’ जाहीर.
१९९७ - स्वित्झर्लंडच्या अवघ्या सोळा वर्षाच्या मार्टिना हिंगीसने चेक प्रजासत्ताकाच्या याना नोव्हात्नाला पराभूत करून कारकिर्दीतील दुसरे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद मिळविताना सर्वांत लहान वयात विंबल्डन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद मिळविण्याची कामगिरी केली.
२००० - राष्ट्रीय मालिकेच्या दुसऱ्या टप्प्यातील मैदानी स्पर्धेत हरियानाच्या शक्तीसिंगने २०.६० मीटर अंतरावर गोळाफेक करुन नवा आशियाई विक्रम नोंदविला. या आधीचा २०.४३ मीटरचा विक्रम कझाकस्तानच्या रुबतोव सर्जीच्या नावावर होता.
२००३ - इंग्रजी भाषेचे ज्येष्ठ तज्ज्ञ आणि महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे माजी संचालक डॉ. रामचंद्र सोनुपंत ऊर्फ रा. सो. सराफ यांचे निधन.
२००४ - युरोपीय फुटबॉल स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून विजेत्या ग्रीसचा कर्णधार थिओडोरस झागोराकीस याची निवड.
२००४ - ग्रीसने युरोपीय फुटबॉल स्पर्धेत अप्रतिम खेळ करीत पोर्तुगालला हरवून अविस्मरणीय अजिंक्‍यपद मिळविले.

दिनमान -
मेष : शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना सुसंधी लाभेल. मनोबल वाढेल.
वृषभ : काहींना अचानक धनलाभ संभवतो. आरोग्य चांगले राहील.
मिथुन : तुम्ही आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. आत्मविश्‍वास वाढेल.
कर्क : नको त्या गोष्टींसाठी वेळ व पैसा खर्च होणार नाही याची काळजी घ्यावी.  
सिंह : वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वाच्या कामात यश मिळवाल. 
कन्या : प्रॉपर्टीच्या संदर्भात प्रस्ताव समोर येतील. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. 
तूळ : अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत रहाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. 
वृश्‍चिक : जिद्द व चिकाटी वाढेल. आश्‍वासनांवर अवलंबून राहू नये.
धनू : तुम्ही आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. संततिसौख्य लाभेल.
मकर : कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना यश लाभेल. मनोरंजनाकडे कल राहील.
कुंभ : प्रॉपर्टीच्या संदर्भातील कामे हळूहळू मार्गी लावू शकाल. संततिसौख्य लाभेल.
मीन : नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.